अजित पवारांनी सतेज पाटलांच्या जखमेवर मीठ चोळले...

सतेज पाटील यांनाही दादांचे बोल ऐकून कसेनुसे झाले असणार..
Ajit Pawar & Satej Patil (22).jpg
Ajit Pawar & Satej Patil (22).jpg

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. आर. आर. पाटील असोत की इतर कोणी, त्यांच्याबद्दल थेट व्यासपीठांवरून मते व्यक्त करताना अजित पवारांनी पुढेमागे पाहिले नाही. असाच प्रसंग पिंपरी-चिंचवडमध्ये घडला. 

पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डीत शुक्रवारी (ता. 17 सप्टेंबर)  डी. वाय. पाटील ज्ञानशांती शाळेच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यावेळी व्यासपीठार होते. अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये तरुणांच्या कौशल्य आणि नवीन इच्छाशक्तीबाबत आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना पवार यांनी काँग्रेसचे राज्यमंत्री सतेज पाटील यांच वय जाणून घेत, आश्चर्य व्यक्त केले व सतेज पाटलांच्या राज्यमंत्रीपदावरून काँग्रेसला चिमटा काढला आहे.

काय अजित पवार म्हणाले?

 "सतेज पाटलांनी मला सांगितलं की ते पन्नाशीला पोहोचले आहेत. आता पन्नाशीला पोहोचले तरी काँग्रेस अजून राज्यमंत्रीच ठेवतेय, हे मला काही कळत नाही. नवीन पीढीला पुढे आणण्यासाठी पवार साहेबांनी मला, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांना तरूण वयात ४० वय असतानाच कॅबिनेट मंत्रिपद दिले होते. त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटायचे की आपल्याकडून चांगल्यात चांगलं घडलं पाहिजे. तेव्हा आम्ही हिरीरीने काम करण्याचा प्रयत्न केला``

हेही वाचा : हे फक्त बारामतीतच घडू शकते..
अजित पवार हे सतेज यांच्याबद्दलच्या सहानुभूतीसाठी असे बोलले असले तरी त्यामुळे पाटील यांची जखम भळभळती झाली असणार. पाटील हे 2009 ते 2014 या कालावधीत गृह राज्यमंत्री होते. 2014 मध्ये त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. तरी भाजपला त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात रोखून धरले. महापालिका निवडणुकीत त्यांनी आघाडीची सत्ता आणली.  2019 च्या विधानसभा निववडणुकीत काॅंग्रेसचा कोल्हापुरातील गड राखण्याची जबाबदारी त्यांनी चांगली सांभाळली. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर आपल्याला चांगले मंत्रीपद मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र राज्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागले. कोल्हापूरचे पालकमंत्रीपदही त्यांना झगडून मिळवावे लागले. त्यामुळे काॅंग्रेसच नक्की काय चाललयं, असा प्रश्न अजितदादांप्रमाणे त्यांना आतापर्य़ंत पडत आला आहे. अजितदादांनी तो जाहीरपणे विचारला एवढेच!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com