देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रद्रोही; पिंपरीत आंदोलकांचा आरोप

राज्याच्या वाट्याचा जीएसटीचा २८ हजार कोटी रुपयांचा परतावा आणण्याचा प्रयत्न करण्याऐवजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यातील जनतेला त्यांच्या कष्टाचा पैसा पीएम केअर फंडाला देण्यासाठी आवाहन करतात. त्यांचा हा केंद्राचे उदो उदो करणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह आहे, असा आरोप पिंपरीत आंदोलकांनी केला
Agitation Against BJP in Pimpri Chinchwad
Agitation Against BJP in Pimpri Chinchwad

पिंपरी : शेतकऱ्यांविषयी निंदाजनक वक्तव्य करणारे भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल,रावसाहेब दानवे,पिंपरी-चिंचवडचे  उपमहापौर केशव घोळवे यांच्या प्रतिमेला भाजप सत्तेत असलेल्या पिंपरी-चिंचवड पालिकेच्या प्रवेशव्दारावरच काल जोडे मारण्यात येऊन त्यांचा निषेध करण्यात आला. या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी,अशी मागणी हे आंदोलन केलेल्या शहरातील सर्व विरोधी पक्ष आणि कामगार संघटनांच्या वतीने यावेळी करण्यात आली.

दरम्यान,राज्याच्या वाट्याचा जीएसटीचा २८ हजार कोटी रुपयांचा परतावा आणण्याचा प्रयत्न करण्याऐवजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यातील जनतेला त्यांच्या कष्टाचा पैसा पीएम केअर फंडाला देण्यासाठी आवाहन करतात. त्यांचा हा केंद्राचे उदो उदो करणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह आहे. अशा महाराष्ट्रद्रोही फडणवीस यांचाही कामगारनगरी तीव्र निषेध करीत आहे, असे प्रतिपादन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी यावेळी केले. 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाकिस्तान व चीनमधून रसद पुरवठा होत असून त्यासाठी भाड्याने माणसे आणल्याचे खळबळजनक वक्तव्य केल्याबद्दल भाजपचे दानवे,घोळवे व गोयल यांच्याविरोधात हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यात शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, समन्वयक मानव कांबळे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते फजल शेख, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, कामगार नेते दिलीप पवार, रोमी संधू, धर्मराज साळवे, युवराज दाखले आदी सहभागी झाले होते.

डॉ. कदम म्हणाले की, सीएसआर फंड देखील पीएम केअर फंडात वर्ग करण्याचा नविन अनिष्ट पायंडा मोदी सरकारने सुरु केला आहे. प्रत्यक्षात सीएसआर फंड हा कंपनी ज्या भागात आहे त्या भागातील सार्वजनिक सोयी सुविधा, पाणी, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, दिवाबत्ती, समाज मंदिरे विकसित करण्यासाठी वापरला जावा हे अभिप्रेत आहे. बाबर म्हणाले की, दिल्लीतील शेतकरी गालबोट लावण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील केंद्रीयमंत्री गोयल आणि दानवे हे शेतक-यांचा अवमान करणारी वक्तव्य करुन आंदोलन कर्त्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. समन्वयक कांबळे तसेच भापकर, शितोळे यांनी देखील केंद्र सरकार व उपमहापौर घोळवे यांचा निषेध करणारी भाषणे केली.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com