सरकारकडून 96 पीआयंना नववर्षाची भेट; प्रमोशनवर बदल्या 

या अधिकाऱ्यांना नववर्षाची ही भेटच मिळाली आहे.
सरकारकडून 96 पीआयंना नववर्षाची भेट; प्रमोशनवर बदल्या 
96 police inspectors in the state got promotions

पिंपरी : गेली तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील 96 पोलिस निरीक्षकांना (पीआय) अखेर आज (ता. 24 डिसेंबर) बढती मिळाली. या सर्वांची बढतीवर बदली झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील चार पीआयचा त्यामध्ये समावेश आहे. या अधिकाऱ्यांना नववर्षाची ही भेटच मिळाली आहे. 

खुल्या जागांवर ही तात्पुरती पदोन्नती असल्याचे गृह विभागाच्या आदेशात म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांतील निवड यादीतील निरीक्षकांना या बढत्या देण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशिक्षण केंद्र (पीटीएस), खंडाळा येथील दोन पोलिस निरीक्षक जितेंद्र जगदाळे यांची उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून लातूर येथे, तर शशिकांत वाखारे यांची पोलिस उपअधीक्षक म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती येथे बदली झाली आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील बढती मिळालेले पोलिस निरीक्षक आणि कंसात बदली झालेले ठिकाण 
विवेक लावंड : (उपविभागीय पोलिस अधिकारी, मुक्ताईनगर, जळगाव) 
राजकुमार शिंदे : (उपअधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे) 
खंडेराव खैरे : (पोलिस उपअधीक्षक तथा डीवायएसपी, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), पुणे) 
प्रकाश धस : (डीवायएसपी, सीआयडी, पुणे) 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in