सामान्यांना करतात तशी दमबाजी शिवसेनेला करायची नायं

राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढल्याचे प्रकरण आज चांगलेच तापले होते. राणे यांच्या निषेधार्थ मुंबईत शिवसैनिकांनी सर्वत्र राडेबाजी केली. गोरेगाव येथे तर राणे यांचा पुतळाही जाळण्यात आला.
सामान्यांना करतात तशी दमबाजी शिवसेनेला करायची नायं
andolan.jpg

मुंबई ः भाजप नेते नारायण राणे हे एरवी सर्वसामान्यांशी किंवा सामान्य कार्यकर्त्याशी ज्या भाषेत बोलतात, त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांबाबत बोलू नये, हा प्राथमिक धडा त्यांना आज मिळाला, असा टोला मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी राणे लगावला आहे.

राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढल्याचे प्रकरण आज चांगलेच तापले होते. राणे यांच्या निषेधार्थ मुंबईत शिवसैनिकांनी सर्वत्र राडेबाजी केली. गोरेगाव येथे तर राणे यांचा पुतळाही जाळण्यात आला. सुर्वे तसेच शिवसेना विभागप्रमुख विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली बोरीवली येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्यावेळी सुर्वे यांनी सकाळ शी बोलताना राणे यांना वरील टोला लगावला. 

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाला वंदन करून आपली जनआशिर्वाद यात्रा सुरु करणाऱ्या राणे यांना शिवसेनेचा हिसका आता कळलाच असेल. एरवीही राणे आणि त्यांचे दोनही पुत्र समाजमाध्यमांवरून कोणावरही हवी तशी आभासी टीका करीत असतात. मात्र शिवसेनेच्या सर्वोच्च नेतृत्वाबद्दल वाटेल ते बोलू नये, हा प्राथमिक धडा आता त्यांना मिळाला असेलच. खरे पाहता राणे हे शिवसेना पक्षातूनच मुख्यमंत्री झाले होते. आता मुख्यमंत्र्यांवर वाटेल तशी टीका करताना, आपणही एकेकाळी त्याच पदावर होतो, याचे भान तरी त्यांनी ठेवायला हवे होते, असा टोमणाही सुर्वे यांनी मारला आहे. 

गोरेगावात फोटो जाळला
गोरेगावात माजी नगरसेवक दिलीप शिंदे, राजू पाध्ये यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांचे छायाचित्र जाळले. यावेळी कोंबडीचोर राणे अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी तेथे कोंबड्याही आणल्या होत्या. यावेळी राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून त्याला चपलांचा मार देण्यात आला व तो पुतळाही जाळण्यात आला. राणे यांनीच काय पण कोणाही भाजप नेत्याने उद्धव ठाकरे यांच्या वाटेला जाऊ नये, असा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in