नवी मुंबईत राजकीय कार्यकर्त्यांची पळवापळवी झाली सुरु  - Political workers switching Parties in the wake of Navi Mumbai Elections | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

नवी मुंबईत राजकीय कार्यकर्त्यांची पळवापळवी झाली सुरु 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका  एप्रिल मध्ये होणार होत्या. त्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विष्णुदास भावे नाटयगृहात आरक्षण सोडत देखील जाहीर झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील आरक्षण पाहता आपल्या प्रभागात काम करण्यास सुरुवात केलेली आहे

वाशी : नवी मुंबई महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीकरीता इच्छुक उमेदवांरानी मोर्चबांधणी केली आहे. सद्यस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांकडून दुसऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करुन घेतला जात आहे. तर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते देखील सोयीनुसार दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी देखील करत आहेत. राजकीय पक्षांच्या कार्यकत्र्याच्या होणाऱ्या कोलंटउडयांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका  एप्रिल मध्ये होणार होत्या. त्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विष्णुदास भावे नाटयगृहात आरक्षण सोडत देखील जाहीर झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील आरक्षण पाहता आपल्या प्रभागात काम करण्यास सुरुवात केलेली आहे. कोरोनासारख्या महाआजारामुळे देशात लागू झालेल्या लॉकडाऊन मुळे अनिश्‍चित काळासाठी पालिका निवडणुका या पुढे ढकलल्या आहेत. मात्र कोरोना नंतर बिहार राज्यामध्ये झालेल्या निवडणुकांमुळे नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकत असल्याची शक्‍यता राजकीय नेत्यांना वाटत आहे. 

त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी प्रभांगातील मतदारांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. तर दुसऱ्या पक्षांतील कार्यकर्त्यांना देखील आपल्याकडून खेचून आणण्याचा प्रकार सुरु आहे. नुकतेच दिघा येथील माजी नगरसेवक किशोर गायकर आणि संगिता पोवळे, राष्ट्रवादीचे वॉर्ड अध्यक्ष गोरख साळवे यांनी आठवडयाभरापुर्वी भाजपात प्रवेश केला होता. तर दुसऱ्याच आठवडयात पुन्हा शिवसेनेमध्ये येत हातावर शिंवबंधन बांधले आहे. यामुळे इच्छुक उमदेवार कोणत्या पक्षाकडून तिकिट मिळण्याची शाश्वती आहे,  त्यांच्याकडे सोयीनुसार कोलंटउडया घेत प्रवेश घेत आहेत. 

राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांना पदांचे वाटप
पालिका निवडणुकांचा वेध लक्षात घेऊन पक्षातील कार्यकत्यांनी पदांची खैरात वाटल्यासारखे पदे वाटप करण्यात येत आहे. इतक्‍या दिवसांपासून कार्यकर्त्यांना पदांपासून वंचित ठेवण्यात आले होते. मात्र निवडणुका डोळयासमोर ठेऊन कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी पदे बहाल करण्यात येत आहेत. तर पद वाटप करण्यात आल्यानतर कार्यकर्ते  देखील सोशल मिडियांवर राजकीय नेत्यांबरोबरचे फोटो टाकून प्रसिध्दी मिळवायला लागले आहेत.

माजी नगरसेवक किशोर गायकर यांच्यासह काही कार्यकत्र्यानी भाजपा मध्ये प्रवेश केला होता. पण त्यांनी भाजपा पक्ष का सोडला या बद्दल त्यांनाच विचारणे योग्य राहील. मात्र राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकाराजयांना कोणत्याही पक्षात प्रवेश केला तरी मतदार हे मतदान हे मात्र योग्य उमेदवारालाचा देतात - नविन गवते, भाजपा माजी नगरसेवक

निवडणुकी मुळे कार्यकत्र्यामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी त्यांना पदांचे वाटप करण्यात येते. तरी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामध्ये पक्ष निष्ठता असणे आवश्‍यक आहे. मात्र आता तसे दिसून येत नाही - द्वारकानाथ भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख नवी मुंबई

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख