कोरोनाची आणखी एक विकेट; आता नव्या मुंबईच्या आयुक्तांची बदली - Navi Mumbai Municipal Commissioner Annasaheb Misal Transferred | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाची आणखी एक विकेट; आता नव्या मुंबईच्या आयुक्तांची बदली

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 जुलै 2020

अण्णासाहेब मिसाळ यांची जुलै २०१९ ला तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या जागेवर बदली झाली होती. मिसाळ यांनी महापालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात निर्माण झालेला दुरावा दूर करून संवाद वाढवला. तसेच रामास्वामी यांनी राबवलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मिसाळ यांना महापालिकेची सूत्रे स्वीकारुन काही महिने न उलटले तेच कोरोना सारख्या आजाराने शहरात शिरकाव केला

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून आयुक्तांच्या बदली होण्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहे. यावरुन मध्यतंरी बरंच राजकारणही तापलं होतं.. त्यातच आता एक नवीन अपडेट समोर आले आहे. आज नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. नव्या पालिका आयुक्तांनी सकाळी पदभार देखील स्विकारला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली आहे. नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर पदभार स्विकारला आहे. बांगर यांनी आज सकाळी पदभार स्विकारला आहे. नवी मुंबईच्या आयुक्तांची बदली दोन आठवड्यांपूर्वीच होणार होती.. पण ती स्थगित करण्यात आली होती. 

अण्णासाहेब मिसाळ यांची जुलै २०१९ ला तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या जागेवर बदली झाली होती. मिसाळ यांनी महापालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात निर्माण झालेला दुरावा दूर करून संवाद वाढवला. तसेच रामास्वामी यांनी राबवलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मिसाळ यांना महापालिकेची सूत्रे स्वीकारुन काही महिने न उलटले तेच कोरोना सारख्या आजाराने शहरात शिरकाव केला.

वाशीत सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात भव्य क्वारंटाईन केंद्र तयार करुन मिसाळ यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं. मात्र, तरी देखील काही नाराज लोकांकडून मिसाळ यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरुच होते. मिसाळ यांना निवृत्त होण्यासाठी काही वर्षे शिल्लक असल्यामुळे त्यांना नवी मुंबई महापालिका नियुक्ती देण्यात आली होती. मिसाळ यांना महापालिकेत जेमतेम एक वर्ष होत आलं आहे.

गेल्याच आठवड्यात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आली. पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या प्रमुख आधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या केल्या. पुणे महापालिकेचे माजी आयुक्त तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेल्या सौरभ राव यांना विभागीय आयुक्तालयात विशेष कार्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पीएमआरडीएचे कार्यकारी आधिकारी विक्रमकुमार यांना महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख