नवी मुंबईत इच्छुक उमेदवारांची वाढली डोकेदुखी - Many Mistakes in Navi Mumbai Voters Lists | Politics Marathi News - Sarkarnama

नवी मुंबईत इच्छुक उमेदवारांची वाढली डोकेदुखी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

प्रारूप मतदार याद्यांकडे सर्वच शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. महानगरपालिकेने निवडणूक विभागाने ठरवून दिल्याप्रमाणे नुकत्याच याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु प्रारूप याद्या तयार करताना फारसे परिश्रम घेतले नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्यक्ष स्थळपाहणी करून प्रभागनिहाय याद्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. अंदाजे मतदारांची नावे टाकण्यात आली आहेत.

वाशी : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. मतदार वास्तव्य एका प्रभागात करीत आहेत व त्यांची नावे दुसय्‌ा प्रभागात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढली असून २३ फेब्रुवारी पर्यत मतदार याद्यांमधील त्रुटी शोधून सूचना व हरकती दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे.

प्रारूप मतदार याद्यांकडे सर्वच शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. महानगरपालिकेने निवडणूक विभागाने ठरवून दिल्याप्रमाणे नुकत्याच याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु प्रारूप याद्या तयार करताना फारसे परिश्रम घेतले नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्यक्ष स्थळपाहणी करून प्रभागनिहाय याद्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. अंदाजे मतदारांची नावे टाकण्यात आली आहेत.

यामुळे अनेक प्रभागांत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ऐरोली मध्ये जवळपास एका प्रभागातील जवळपास पाचशे मतदार दुसजया प्रभागात दाखवण्यात आले आहे. दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, बेलापूर, सीवूड व इतर परिसरामध्येही अशाच प्रकारे त्रुटी आढळू लागल्या आहेत. मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना धावपळ करावी लागणार आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी मतदार याद्यांमधील त्रुटी शोधण्यास सुरुवात केली आहे. मुदतीमध्ये सूचना व हरकती दाखल करण्यात येणार असल्याचे अनेकांनी सांगितले. २३ फेब्रुवारी ही यादीवर हरकती व सुचना घेण्याची अखेरची तारीख असल्यामुळे इच्छुक उमेदवार याद्यावर काम घेत असून हरकती नोंदवत आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख