हा आहे भारत....ही आहे 'मदर इंडिया..स्वतः अनवाणी राहून मुलाची वाटचाल सुखद करणारी

डोक्यावर तळपता सुर्य आणि पायाखाली तप्त डांबर तुडवत ते मायलेक निघाले होते. आईने स्वतः अनवाणी होऊन मुलाला चटके सोसणार नाही म्हणून आपल्या चपला मुलाला दिल्या होत्या. डोळ्यापुढे अंधारी आणेल असे हे वास्तव आहे
Mother and Son Walking in Heat to Their Village
Mother and Son Walking in Heat to Their Village

नाशिक : कोरोनाने या जगाला खूप काही शिकवले. खूप काही दाखवले. त्यात आज दुपारी उन्हाने तापलेल्या महामार्गावरून शेकडो मैल लांब असलेल्या गावाकडे चाललेल्या मायलेकांचे चित्र सोशल मिडीयावर फिरते आहे. डोक्यावर तळपता सुर्य आणि पायाखाली तप्त डांबर तुडवत ते मायलेक निघाले होते. आईने स्वतः अनवाणी होऊन मुलाला चटके सोसणार नाहीत, म्हणून आपल्या चपला मुलाला दिल्या होत्या. डोळ्यापुढे अंधारी आणेल असे हे वास्तव आहे.

गेले काही दिवस देशातील सर्वच महामार्गांवर एक वेगळा भारत दिसतो आहे. पोटासाठी महानगरात आलेल्या या महानगराला कोरोनाने त्यांचे भविष्य अंधकारमय केले आहे. त्यामुळे या कोरोनाला शरण न जाता ते आपल्या गावाकडे निघाले. रेल्वे, बस, गाड्या, वाहने कसलीही वाट न पाहता. उत्तर भारतात जायचे असो वा पश्चिम भारतात त्यासाठीचा रस्ता जातो नाशिकमधून. त्यामुळे हे रस्ते गर्दीने रात्रदिवस वाहात आहेत. ही गर्दी हटत नाही. त्यांचा रस्ता संपत नाही. त्यातून महात्मा गांधीचा संदेश खेड्याकडे चला याचे स्मरण होते. 

भर दुपारी तळपत्या उन्हात उत्तर प्रदेश, बंगाल, बिहारकडे निघालेल्या विविध घोळक्यांत एक माऊली आपल्या मुलाचा हात धरुन अक्षरशः ओढत चाललेली दिसते. हे तसे प्रतिनिधीक चित्र. डोक्यावर तळपणारा सुर्य, पायाखाली तापलेली सडक. त्याच्या चटके सहन करीत, मात्र माझ्या वाट्याला आलेले भुकेचे, दारिद्रयाचे चटके पुढच्या पिढीला नको म्हणून तिने चक्क आपल्या चपला मुलाला घातलेल्या असतात. बारीक लक्ष घातले तरच ते विदारक चित्र नजरेत भरत होते. एकदा नजरेत भरले तर मनाला भिडत होते. मनाला प्रश्न पडायचा, एरव्ही पाणी, जेवण, नाश्ता अन् मदतीसाठी धावणारी राजकीय मंडळी. त्यांची मदत यांच्यापर्यंत पोहोचलीच नव्हती.

कोरोनामुळे समोर आला वेगळा भारत....

सगळे राजकीय पक्ष जी मदत देत होते तेव्हा हे मायलेक नव्हते. त्यामुळे ते वंचित राहिले. हा वंचित वर्ग, जो देशाच्या सर्व महामार्गांवरुन शेकडो मैलांची पायपीट करीत आपल्या गावाकडे निघाला आहे. हा एक वेगळाच भारत आहे. एरव्ही तो कोणाच्या खिजगणतीत नसतो. कोरोनामुळे जे संकट आले, त्यामुळे तो लोकांच्या नजरेस पडला. त्याची कणव सगळ्यांनाच आहे. अनेक जण ते बोलून दाखवितात. विरोधक त्यांच्यासाठी काही तरी करा, किमान बसगाड्या पुरवा, रेल्वे सुरु करा अशी मागणी करतात. प्रशासन सरकारी कार्यपद्धतीत जे शक्य होईल ते करते. पण खरे मायलेक, अर्थात दिवंगत मनोज कुमार यांच्या चित्रपटात नजरेस पडणारा, महात्मा गांधींनी ज्यांच्यासाठी खेड्याकडे चला हा संदेश दिला, तो 'भारत' सरकारच्या योजनांपासून, राजकारण्यांच्या पॅकेजेसपासून खूऽऽप खूप लांब आहे हेच खरे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com