नारायण राणे समर्थक प्रमोद जठार यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची तुलना छत्रपती संभाजी महाराज तर पोलिसांची तुलना औरंगजेबाच्या सैन्याशी करणे अत्यंत गैर आहे. त्याने समस्त महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत.
नारायण राणे समर्थक प्रमोद जठार यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा
Karan Gaikar

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची तुलना छत्रपती संभाजी महाराज (Comparison of Narayan Rane with Chhatrapati Sambhaji maharaj) तर पोलिसांची तुलना औरंगजेबाच्या सैन्याशी करणे अत्यंत गैर आहे. (Maharashtra police Compair with Aurangzeb`s soldiery is very bad) त्याने समस्त महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. (This heart a sentimate of People) त्यामुळे अशी तुलना करणारे प्रमोद जठार (Pramod Jathar) यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई करावी. अशी मागणी छावा क्रांतिवीर सेना संस्थापक, अध्यक्ष आणि मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर (Karan Gaikar) यांनी केली आहे. 

यासंदर्भात छावा संघटनेच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. छत्रपतींच्या नावाशी तुलना करून महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान करणाऱ्यांविरूध्द आवश्यक ती कारवाई न झाल्यास छावा क्रांतिवीर सेना आंदोलन करील असा इशारा त्यांनी दिला. 

ते म्हणाले, स्वराज्याचे तोरण बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज, सुराज्याचा वारसा तेवत ठेवणारे धर्मवीर संभाजी राजे ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. महाराष्ट्राच्या आराध्य असलेल्या या विभूतींच्या कर्तृत्वाची, त्यांच्या नावाशी तुलना होऊच शकत नाही. नजिकच्या  भविष्यातही अशा विभूती जन्माला येतील अशी शक्यता नसल्यासारखीच आहे. एव्हढे महान कार्य केलेल्या विभूतींच्या नावासोबत आजच्या नितीमुल्यांचा लिलाव मांडणाऱ्या राजकारण्यांचे नाव जोडण्याचा उद्योग त्यांच्या काही अंध समर्थकांनी सुरू केला आहे. 

अगदी कालचेच उदाहरण द्यायचे झाले तर प्रमोद जठार नामक एका समर्थकाने आपला विवेक नितीशुन्य राजकारणाच्या पायावर गहाण ठेवून नारायण राणे यांच्या अटकेच्या प्रसंगाची तुलना अशीच केली. धर्मवीर  छत्रपती संभाजीराजे यांना आक्रमक, लुटारू मुघल बादशहाने केलेल्या अटकेशी त्याची तुलना केली. यातून डर्टी पॅालिटीक्सला पुण्यवान करण्याचा नाठाळ खोडकरपणा केला आहे. त्यांच्या या कृतीने महाराष्ट्राच्या मातीच्या अस्मितेचा अवमान तर झालाच शिवाय कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या महाराष्ट्राच्या पोलीसांवर देखील अप्रत्यक्षपणे अन्याय झाला. कारण पोलिसांना मुघल सैन्याची उपमा दिली आहे. 

यासंदर्भात संबंधीतांवर कलम ५००, ५०५ (२), १५३ अ, १५३ ब (i), (c) या कलमांनुसार कायदेशीर कारवाई करून धडा शिकवावा. सामाजिक भावना दुखावणाऱ्या प्रवृत्तींवर गुन्हा दाखल करून सर्व न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे प्रमोद जाधव, किरण डोके, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, गणेश वाकचौरे, योगीराज पाटील आदी उपस्थित होते. 
...
हेही वाचा...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in