राज्यात चक्क ६३ लाख शिवभोजन थाळ्यांचे वाटप : छगन भुजबळांची माहिती

सामान्य परिस्थतीमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत महिन्यात साधारणतः ३५ लाख क्विंटल धान्य वितरीत केले जाते. मात्र एप्रिलमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या ३१ लाख ५१ हजार क्विंटल मोफत तांदूळ वाटपामुळे दुप्पट म्हणजे ६८ लाख १३ हजार क्विंटल अन्नधान्य वाटप केले आहे
Sixtry Three Lacks ShivBhojan Thalis Distributed during Lock Down
Sixtry Three Lacks ShivBhojan Thalis Distributed during Lock Down

नाशिक : लॉकडाऊन काळात व लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने अन्न, धान्य वाटपात विक्रम नोंदविला आहे. एप्रिलमध्ये ६८ लाख १३ हजार क्विंटल, मेमध्ये ७६ लाख ८३ हजार क्विंटल धान्याचे वाटप केले आहे. १ एप्रिल ते ५ जूनपर्यंत ६२ लाख ८४ हजार ४१३ शिवभोजन थाळ्यांचे वाटप केले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

सामान्य परिस्थतीमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत महिन्यात साधारणतः ३५ लाख क्विंटल धान्य वितरीत केले जाते. मात्र एप्रिलमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या ३१ लाख ५१ हजार क्विंटल मोफत तांदूळ वाटपामुळे दुप्पट म्हणजे ६८ लाख १३ हजार क्विंटल अन्नधान्य वाटप केले आहे. सरकारने राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे योग्य नियोजनातून गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

ते म्हणाले, "एप्रिलमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ६.६९ कोटी नागरिकांना ३६ लाख ६१ हजार क्विंटल (९५ टक्के) धान्य वितरीत केले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी नियमित धान्य घेतल्यानंतर एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिना ५ किलो मोफत तांदूळ दिले जात असून, त्यात एप्रिलमध्ये ५ कोटी ९३ लाख (९० टक्के) लाभार्थ्यांना ३१ लाख ५१ हजार ३८० क्विंटल मोफत तांदळाचे वितरण केले. स्थलांतरीतांपैकी राज्यात अडकलेल्या ३६ लाख ५८ हजार ६९९ लाभार्थ्यांना एप्रिलमध्ये धान्य देण्यात आले.''

मेमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ६.५८ कोटी नागरिकांना ३६ लाख ९२ हजार ०९० क्विंटल (९० टक्के) धान्य वितरीत केले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ६ कोटी ०२ लाख लाभार्थ्यांना ३१ लाख ७३ हजार २२० क्विंटल (९१ टक्के) मोफत तांदळाचे वितरण केले. स्थलांतरीतांपैकी १९ लाख ४६ हजार ५३४ स्थलांतरीत लाभार्थ्यांनी राज्यात धान्य घेतले, अशी माहितीही भुजबळ यांनी दिले. 

गरीब कल्याण योजनेअंतर्गतही धान्याचे वाटप

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र ७ कोटी लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांमध्ये मोफत तुरडाळ, चणाडाळ या दोन्हींपैकी एक डाळ प्रत्येक महिन्याला प्रति कार्ड एक किलो दिली. योजनेंतर्गत मेमध्ये ९७ हजार ५ क्विंटल मोफत डाळ वितरण केली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या एपीएल केसरी कार्डधारक ३ कोटी ८ लाख लाभार्थ्यांपैकी १ कोटी ५८ लाख नागरिकांनी मेमध्ये ८ लाख १८ हजार क्विंटल धान्य घेतले.

शिवभोजन थाळीला प्रतिसाद

शिवभोजन थाळीच्या संख्येत ५० हजारांची वाढ केल्यामुळे राज्यात आता रोज ८३८ शिवभोजन केंद्रांमधून दीड लाख शिवभोजन थाळीचे वितरण होत आहे. राज्यात एप्रिलमध्ये ७७२ केंद्रांमधून २३ लाख ९९ हजार ७३७ शिवभोजन थाळ्या, मेमध्ये ८३८ केंद्रांमधून ३३ लाख ८४ हजार ०४० शिवभोजन थाळ्या तर ५ जूनपर्यंत ८३८ केंद्रांमधून ५ लाख ६३६ शिवभोजन थाळीचे वितरण केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com