नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी शिवसेना खासदाराचे अजित पवारांना साकडे

नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी लवकरच मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या प्रकल्पाला केंद्र सरकारने नुकतीच तत्वतः मान्यता दिल्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
MP Hemant Godse Meets Ajit Pawar for Nashik Pune Railway
MP Hemant Godse Meets Ajit Pawar for Nashik Pune Railway

नाशिक : नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी लवकरच मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारने नुकतीच तत्वतः मान्यता दिल्यामुळे राज्य सरकारने मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी ही ग्वाही श्री. पवार यांनी दिली. 

पुणे आणि नाशिक या दोन शहरांसह या भागातील वाहतूक, व्यापार आणि औद्योगिकरणासाठी हा रेल्वेमार्ग अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. मात्र त्यासाठी राज्य शासन आणि केंद्र सासनामध्ये समन्वय आवश्‍यक आहे. राज्य शासनाने यातील आपला आर्थिक सहभाग दिल्यास या कामाला चालना मिळेल. अन्यथा त्याच्या मार्गात अडथळेच येतील. मनमाड -इदूर रेल्वेमार्गाला देखील यापूर्वी मंजूरी मिळाली होती. मात्र मध्य प्रदेश सरकारनेच त्यात उदासिनता दाखविली होती. हा प्रकार पुणे रेल्वेमार्गात होऊ नये यासाठी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्याला अजित पवार यांनीही प्रतिसाद दिला आहे. 

मुंबई-पुणे-नाशिक विकासाचा सुवर्ण त्रिकोण

मुंबई- पुणे- नाशिक हा राज्यातील विकासाचा सुवर्ण त्रिकोण आहे. मुंबई-पुणे हे शहर एकमेकांना रेल्वेने जोडली गेल्याने या शहरांचा मोठा विकास झाला आहे. नाशिक हे रेल्वेमार्गे पुण्याला जोडण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार गोडसे पाठपुरावा करीत आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी संसदेत आवाज उठविल्यानंतर नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी दोनशे कोटी रुपये मंजूर झाले होते. सर्वेक्षण पूर्ण झाले असून, केंद्राने चार दिवसांपूर्वी या मार्गाच्या प्रस्तावास तत्वतः मान्यता दिल्याचे श्री. गोडसे यांनी सांगितले.

या मार्गासाठी सुमारे सोळा हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून, पैकी वीस टक्के राज्य, वीस टक्के केंद्र सरकार देणार आहे. साठ टक्के निधी कर्जरोख्यातून उभारला जाणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने या प्रकल्पाला तातडीने मान्यता देऊन निधी मंजूर करावा, यासाठी खासदार गोडसे यांनी मंगळवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

रेल्वे मार्गाअभावी उद्योगवाढीला मर्यादा

द्राक्ष, कांदा आणि भाजीपाला यांचे प्रमुख केंद्र नाशिक जिल्ह्यात आहे. शहरात सातपूर आणि अंबड, तसेच जिल्ह्यात मुसळगाव, माळेगाव, गोंदे या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आहे. मात्र, नाशिक- पुणे रेल्वेमार्ग नसल्याने उद्योग, व्यवसायवाढीस मर्यादा आल्या आहेत. जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्यासाठी या रेल्वेमार्गाचा विषय मार्गी लावणे अत्यंत गरजेचे असल्याचे गोडसे यांनी या वेळी नमूद केले. प्रस्तावित रेल्वेमार्ग ज्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातून जातो अशा सर्व आमदार, खासदारांची मंत्रालयात लवकरच विशेष बैठक घेण्याची ग्वाही श्री. पवार यांनी दिली. 

भूमीपुजन होऊनही प्रत्यक्ष मार्ग नाहीच

नाशिक -पुणे रेल्वेमार्गाला प्रदीर्घ इतिहास आहे. १९९५ मध्ये खासदार डॉ. वसंत पवार यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी त्याच्या सर्व्हेक्षणास मान्यता दिली. त्याचे भूमीपुजन नाशिक रोड येथे झाले होते. त्यानंतर केंद्रात सत्तांतर झाले. हा प्रकल्प विस्मरणात गेला. मात्र त्यासाठी सातत्याने मागणी होत होती. आता खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्याने २०१८ मध्ये त्याचे सर्व्हेक्षण झाले. भुसंपादनाची प्रक्रीया सुरु होणार आहे. प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य व केंद्र सरकार दोघांचा आर्थिक सहभाग महत्वाचा आहे. 

... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com