मुख्यमंत्री साहेब, मालेगावातून लपून-छपुन नाशिकला येणाऱ्यांना आवरा

नाशिक शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र मालेगाव आणि अन्य शहरांमधून लपुन-छपून लोक नाशिकमध्ये वास्तव्याला, कामानिमित्त येतात. त्यामुळे या लोकामार्फत शहरात कोरोना फैलावत आहे. त्यामुळे अशा लोकांच्या येण्या-जाण्यावर प्रतिबंध घालावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुक विजय करंजकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्री साहेब, मालेगावातून लपून-छपुन नाशिकला येणाऱ्यांना आवरा

नाशिक :  नाशिक शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र मालेगाव आणि अन्य शहरांमधून लपुन-छपून लोक नाशिकमध्ये वास्तव्याला, कामानिमित्त येतात. त्यामुळे या लोकामार्फत शहरात कोरोना फैलावत आहे. त्यामुळे अशा लोकांच्या येण्या-जाण्यावर प्रतिबंध घालावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींसमवेत व्हीडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी करंजकर यांनी ही तक्रार केली. ते म्हणाले, ''मालेगाव शहरातील नागरीकांच्या दृष्टीने आता भाजप पाठोपाठ शिवसेना देखील रडारवर आल्याचे पाहायला मिळू शकते. शिवसेना नेते, कृषीमंत्री दादा भुसे मालेगावकरांसाठी दिवस-रात्र एक करीत आहेत. मालेगावच्या नागरीक, कोरोनाबाधीतांसाठी झटत आहेत. दुसरीकडे शिवसेना जिल्हाप्रमुख करंजकर यांनी वेगळाच राग आळवला. करंजकर यांच्या या भूमिकेमुळे नाशिक शहर व जिल्ह्यात शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दोन भिन्न भुमिका पाहायला मिळत असल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे.'' 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांशी व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला. नाशिकमधून विजय करंजकर यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. ''मालेगाव शहरातील वाढत्या करोना रुग्णसंख्या व कोरोनाग्रस्त नागरीकांमुळे नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दररोज वाढते आहे. मालेगावमधून मोठ्या प्रमाणात नागरीक नाशिकसह विविध भागात लपून- छपून येतात. त्यामुळे नाशिक शहरातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मालेगाव शहरासारखेच नाशिक शहरात देखील झोपडपट्टी परिसरात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे वेळीच मालेगाव मधून ये-जा करणाऱ्या लोकांवर प्रतिबंध घालावा, त्यामुळे नाशिकमध्ये रुग्णांमध्ये वाढ होणार नाही,'' अशी सुचना त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

भाजपनेही केली होती मागणी

काही दिवसांपूर्वी अशीच मागणी भाजपच्या शहरातील तिन्ही आमदारांनी केली होती. आता शिवसेनच्या जिल्हाप्रमुखांनीही अशीच तक्रार केल्याने कोरोनाच्या प्रश्‍नावर नाशिक विरुध्द मालेगाव संघर्ष उभा राहू नये हीच अपेक्षा आहे.

'मविप्र' संस्थेला किटस पुरवा 

मालेगाव मध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांचे स्वॅब 'मविप्र'च्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी येतात. त्याअनुषंगाने स्वॅब टेस्टींग कीट तातडीने उपलब्ध करावेत. शहरातील पंचेचाळीस  वयाच्या आतील खासगी डॉक्‍टर, नर्सेस स्वेच्छेने काम करण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. त्यांना पीपीई किटस्‌ उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानुसार कोवीड योध्दा म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांनी जिल्ह्यातील शिवसेना कार्यालयात नावे नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com