गुड न्यूज ः शिरपूर नगर पालिकेची वाटचाल वीजबिलमुक्तीकडे 

विजबिलावर सर्वाधिक खर्च असलेल्या शिरपूर (जि. धुळे) नगर पालिकेने "विजबिलमुक्ती'चा संकल्प करीत सोलर नगरपालिका बनण्याच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
 Shirpur Nagarpalika move towards electricity bill exemption
Shirpur Nagarpalika move towards electricity bill exemption

शिरपूर : विजबिलावर सर्वाधिक खर्च असलेल्या शिरपूर (जि. धुळे) नगर पालिकेने "विजबिलमुक्ती'चा संकल्प करीत सोलर नगरपालिका बनण्याच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नगर पालिकेचा जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्णत: सौरऊर्जा यंत्रणेद्वारे संचलित करण्यासाठी तेथे एक मेगावॉट क्षमतेचा सोलर ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने नगरपालिकेच्या अंतर्गत असलेले सर्व प्रकल्प सौरऊर्जेवर चालवण्यात येतील, अशी माहिती नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी दिली. 


नगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विजबिलांच्या विषयावर चर्चा करून या संदर्भातील निर्णय घेण्यात आला. नगर पालिकेचा सर्वाधिक खर्च विजबिलांवर होतो. एकट्या जलशुद्धीकरण केंद्राचे वार्षिक वीज देयक एक कोटी 80 लाख रुपयांचे आहे. त्यामुळे हा खर्च आटोक्‍यात आणण्यासाठी सौर ऊर्जेसारखे पर्याय निवडायला हवेत, असे आग्रही प्रतिपादन नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी केले होते. त्यानंतर "सौर पालिका' तयार करण्याबाबत विविध निर्णय घेण्यात आले आहेत. 

येथे होणार सौरउर्जा प्रकल्प 

पहिल्या टप्प्यात वरझडी रस्त्यावरील नगर पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर एक मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इंदिरा गांधी रुग्णालय, नगर पालिकेची प्रशासकीय इमारत, पांडू बापू माळी विद्यालयाची इमारत, शहरातील पथदिवे यासह नगर पालिका वीजबिल भरत असलेल्या शहरातील सर्व इमारतींवर वेगवेगळ्या क्षमतेची सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

नगर पालिकेवरील विकासकामांचा भार व त्यावरील खर्च लक्षात घेता येत्या काळात आस्थापना खर्चावरील बचतीकडे अधिक लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. विजबिलांवर होणारा खर्च खूप मोठा आहे. त्यामुळे सौरऊर्जेचा पर्याय निवडणे आवश्‍यक झाले. वीजबिलात कपात झाल्याने बचत झालेला निधी अन्य विकासकामांकडे वळवता येईल, असे नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com