एकनाथ खडसे क्वारंटाईन; पवारांचा खानदेश दौरा रद्द - Sharad Pawar Khandesh Tour Cancelled due to Corona to Rohini Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

एकनाथ खडसे क्वारंटाईन; पवारांचा खानदेश दौरा रद्द

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

रोहिणी खडसे कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने त्यांचे वडील एकनाथ खडसे यांनी स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा खानदेश दौरा रद्द झाला आहे. दौरा रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे. 

जळगाव : रोहिणी खडसे कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने त्यांचे वडील एकनाथ खडसे यांनी स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा खानदेश दौरा रद्द झाला आहे. दौरा रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे. 

माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या अॅड. रोहीणी खडसे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर खडसे यांची जिलह्यात राजकीय बैंठकासाठी उपस्थिती होती., मात्र त्यांनी आपली तपासणी केली असता त्याचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. अॅड. रोहिणी खहसे यांनी याबाबत टि्वटव्दारे माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की माझी कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. मात्र सावधानता म्हणून मी रूग्णालयात दाखल होत आहे.

शरद पवार खानदेश दौऱ्यावर यापुर्वी देखील म्‍हणजे मार्च महिन्यात येणार होते. मार्च महिन्यात चांदसर (ता. धरणगाव) येथे कार्यक्रमानिमित्‍ताने येणार होते. परंतु, राज्‍यात कोरोनाला सुरवात झाल्‍यानंतर हा कार्यक्रम देखील ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. तर येत्‍या २० व २१ नोव्हेंबरला शरद पवार यांचा दौरा निश्‍चित केला होता. परंतु धुळे, नंदुरबार जिल्ह्याचा होणारा दौरा रोहिणी खडसे कोरोना पॉझिटिव्ह शिवाय एकनाथ खडसे देखील क्‍वारंटाईन असल्‍याचे सांगण्यात येत आल्यामुळे दौरा रद्द करण्यात आला आह

एकनाथ खडसे यांनी महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसे यांच्या प्रवेशानंतर भाजपचा बाले किल्ला असलेल्या उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. याता शरद पवार हे २० आणि २१ तारखेला धुळे आणि नंदुरबार येथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राचा दौरा येणार होते. परंतु हे कार्यक्रम रद्द होवून लांबणीवर पडला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख