कोरोनाचा कहर : नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन स्थगित...

नाशिक येथे 26, 27 व 28 मार्च रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
Sahitya Sammelan in Nashik postponed due to corona says kautikrao thale patil
Sahitya Sammelan in Nashik postponed due to corona says kautikrao thale patil

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ९४ वे साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा नाशिकमध्येच संमेलन घेण्यात येणार असल्याचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी जाहीर केले आहे. 

मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांता कोरोनाचा प्रादुर्भाव पून्हा वाढू लागला आहे. त्यामुळे नाशिक येथे 26, 27 व 28 मार्च रोजी साहित्य संमेलनाच्या आयोजनावर प्रश्चचिन्ह उपस्थित राहिले होते. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे हे संमेलन घेणे कितपत सुरक्षित आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले होते. संमेलनाच्या नियोजनाबाबत संमेलन समन्वयक समीर भुजबळ, मुख्य समन्वयक विश्‍वास ठाकुर, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांच्यात बैठक झाली असून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशीही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

नाशिकमध्ये साहित्य संमेलनाची तयारी जोरदार सुरू होती. राज्यातील कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने संमेलन घेण्याचा निर्णय घेतला होता. पण आता राज्यातील एखादा जिल्हा वगळता नाशिकसह सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याबाबत स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशीही चर्चा केली आहे. तसेच महामंडळाच्या इतर शाखांशीही चर्चा करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिककर जेव्हा सांगतील तेव्हा संमेलन घेतले जाईल, असे ठाले-पाटील यांनी सांगितले. 

कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन पुढे ढकलावे अथवा ऑनलाइन पद्धतीने घ्यावे, असा सूर साहित्यिक आणि नाशिककरांकडून येऊ लागला होता. बाहेरून येणाऱ्यांकडून कोरोनाचा फैलाव होऊ शकतो याची शक्यताही नाकारता येत नव्हती. राज्यात सध्या मुंबई, पुणे, ठाणे आणि विदर्भ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. 

स्वागताध्यक्ष छगन भुजबळही कोरोनाग्रस्त

संमेलनाच्या स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांना आठवडाभरापूर्वीच कोरोना झाल्याने ते उपचार घेत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत संमेलनासंदर्भात घोषणा होणार नाही. त्यामुळे नाशिकमध्ये होणारे संमेलन आता पुढे ढकलणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानूसार संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com