हुश्श..पुण्याच्या रिंग रोडला अखेर अर्थसंकल्पातून चालना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज झालेल्या अर्थसंकल्पामध्ये पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला राज्य सरकारच्या मंजुरीची घोषणा केली आहे. तसेच काही वर्षे केवळ चर्चेत असलेल्या रिंग रोडलाही या अर्थसंकल्पाद्वारे चालना देण्यात आली आहे.
Ajit Pawar Announced Pune Nashik High Speed Railway Project
Ajit Pawar Announced Pune Nashik High Speed Railway Project

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज झालेल्या अर्थसंकल्पामध्ये पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला राज्य सरकारच्या मंजुरीची घोषणा केली आहे. तसेच काही वर्षे केवळ चर्चेत असलेल्या रिंग रोडलाही या अर्थसंकल्पाद्वारे चालना देण्यात आली आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी बहुचर्चित पुण्याच्या रिंग रोडला मंजुरी देताना तब्बल २६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) हा रिंग रोड होणार आहे. त्याची लांबी सुमारे १७० किलोमीटर असून हा आठ पदरी रस्ता असून सार्वजनिक - खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हा रस्ता साकारला जाईल. त्यासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया या पूर्वीच सुरू झाली आहे. या रस्त्यामुळे पुणे शहरातील वाहतुकीच्या कोंडीची समस्या कमी होईल, अशी अपेक्षा आहे. या रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया या वर्षी सुरू होणार आहे.

त्याचबरोबर बहुप्रतिक्षेत असलेल्या पुणे - नाशिक लोहमार्गाला अखेर मंजुरी मिळाली आहे. सुमारे १६ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून तो ‘पीपीपी’ तत्त्वावर साकारणार जाईल. या प्रकल्पाला रेल्वे खात्याने या पूर्वीच मंजुरी दिली आहे. या लोहमार्गाची लांबी २३५ किलोमीटर असून ताशी २०० किलोमीटर वेगाने त्यावर रेल्वे धावेल. या मार्गावर २४ स्थानके असतील. या रेल्वेमार्गाद्वारे पुणे -नाशिक हे अंतर दोन तासांत प्रवाशांना कापता येईल, अशी अपेक्षा आहे. ‘महारेल’च्या माध्यमातून पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. 

पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ उभारण्याची घोषणा या अर्थसंकल्पात झाली आहे. पुण्यात जागतिक दर्जाचे म्हाळुंगे - बालेवाडी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे. या पार्श्वभूमीवर आता क्रिडा विद्यापीठ साकारणार आहे. त्याचा पुरेसा तपशील अद्याप जाहीर झालेला नाही. तसेच साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेता जैव सुरक्षा प्रयोगशाळाही आता पुण्यात साकारणार आहे. या प्रयोगशाळेत साथीच्या रोगांवर संशोधन करून त्या माध्यमातून उपाययोजना करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com