सत्ताधाऱ्यांना पोलिस प्रशिक्षण केंद्र हलवू देणार नाही 

"राज्यात सत्तेत बदल झाला; म्हणून जुन्या सरकारने मंजूर केलेले प्रकल्प बदलून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या जिल्ह्यात घेऊन जाणे, हे अयोग्य आहे. ही पद्धत बरोबर नाही.
The police training center will not allow the to move
The police training center will not allow the to move

जळगाव : "राज्यात सत्तेत बदल झाला; म्हणून जुन्या सरकारने मंजूर केलेले प्रकल्प बदलून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या जिल्ह्यात घेऊन जाणे, हे अयोग्य आहे. ही पद्धत बरोबर नाही.

जळगाव जिल्ह्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यात स्थलांतरीत करण्याचा राज्य सरकारचा निर्णय अयोग्य आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प हलवू दिला जाणार नाही,' असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. 

युती सरकारच्या काळात जळगाव जिल्ह्यातील हतनूर वरणगाव येथे राज्य राखीव दलाचे पोलिस प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले होते. त्याच्या जागेचे भूमिपूजनही तत्कालीन मंत्री (कै.) गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, आता हे प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यातील कुडसगाव येथे हलविण्याचा अध्यादेश सरकारकडून जारी करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून राजकारणही तापले आहे. 

याबाबत बोलताना माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले, "राज्यात सत्तेत बदल झाला; म्हणून जुन्या सरकारने मंजूर केलेले प्रकल्प नवीन सरकारने पळवून घेवून जाणे चुकीचे आहे. या सरकारची ही पद्धत चुकीची आहे.' 

"नवीन प्रकल्प नाही, जुनेच पळविता' 

जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारने एकही नवीन प्रकल्प दिला नाही. मात्र, जुन प्रकल्पही ते पळवित आहेत. वर्षानुवर्षे प्रयत्न करून जळगाव जिल्ह्यात राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले होते. आपण पालकमंत्री असताना त्यासाठी निधीही देण्यात आला होता, त्यासाठी आर्किटेक्‍टचरची नियुक्तीही करण्यात आली होती. त्या जागेवर वॉल कंपाउंडही उभे करण्यात आले होते. वास्तविक नवीन सरकारने हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. मात्र त्यांनी उलट केले, या ठिकाणचा प्रकल्पच दुसऱ्या जिल्ह्यात हलविण्यात आला आहे, असे माजी मंत्री महाजन म्हणाले. 

प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र 

जळगाव जिल्ह्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रांचा हा प्रकल्प आपण कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याबाहेर स्थलांतरीत होऊ देणार नाही, असे मत व्यक्त करून आमदार गिरीश महाजन म्हणाले, "आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याबाबत पत्र लिहिले आहे. या शिवाय जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदारांची बैठक घेऊन त्याबाबत एकमताने हा प्रकल्प स्थलांतरीत करण्यास विरोध करू. वेळप्रसंगी आंदोलनाची भूमिकाही घेतली जाईल.' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com