आमदार दिलीप बनकरांनी खडसावले...संकटातही गैरव्यवहार कराल तर गाठ माझ्याशी आहे - NCP MLA Dilip Bankar Warned Rationing Officers not to indulge in Malpractices | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार दिलीप बनकरांनी खडसावले...संकटातही गैरव्यवहार कराल तर गाठ माझ्याशी आहे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 मे 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन अंत्योदय, प्राधान्य व केशरी कार्ड धारकांना मोफत तांदूळ व अल्पदरात गहू देत आहे. त्याचे वितरण रेशनच्या माध्यमातून सुरु केलेले आहे. सध्या कोरोनाचा संकट आहे. याची जाणीव ठेऊन चांगले काम करा. या संकटातही गैरव्यवहार कराल तर गाठ माझ्याशी आहे. हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत आमदार दिलीप बनकर यांनी अधिका-यांना खडसावले

निफाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन अंत्योदय, प्राधान्य व केशरी कार्ड धारकांना मोफत तांदूळ व अल्पदरात गहू देत आहे. त्याचे वितरण रेशनच्या माध्यमातून सुरु केलेले आहे. सध्या कोरोनाचा संकट आहे. याची जाणीव ठेऊन चांगले काम करा. या संकटातही गैरव्यवहार कराल तर गाठ माझ्याशी आहे. हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत आमदार दिलीप बनकर यांनी अधिका-यांना खडसावले.

याबाबत आमदार दिलीप बनकर यांनी आढावा बैठक घेऊन तालुक्यातील रेशन कार्डचा घेतला आढावा. यावेळी निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, तालुका पुरवठा अधिकारी महाजन, झोटींग, हिरे यांच्या सह तालुक्यातील रेशनदुकानदारचे काही प्रतिनिधी उपस्थित होते. ''सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. यानुसार महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. महाराष्ट्र शासन या महाभयंकर आजाराचा सामना करत आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने मोफत व अल्प दरात अन्नधान्य  रेशन दुकानामार्फत वाटप करण्यात येत आहे. या वाटपामध्ये निफाड तालुक्यात कुठलाही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही .जर कुणी गैरव्यवहार केले तात्काळ कारवाई करू,'' असे आव्हान निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी केले. 

शासनाने अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने पुरवठा मंत्री भुजबळ यांनी अंत्योदय, प्राधान्य व केशरी कार्ड धारकांना मोफत तांदूळ व अल्पदरात गहू देण्याचा निर्णय घेऊन त्याचे वितरण रेशनच्या माध्यमातून सुरु केलेले आहे. त्याचा सर्व निफाड तालुक्यातील अंत्योदय, प्राधान्य व केशरी कार्ड धारकांना लाभ मिळत असून त्यानुसार निफाड तालुक्यात एकुण १०९९२ अंत्योदय (पिवळे) रेशनकार्ड धारकांची संख्या असून ५११८३ व्यक्ती लाभ घेत आहेत.  प्राधान्य कुटुंबातील  रेशनकार्ड धारकांची ६०२१७ इतकी संख्या असून ३०२१३४ व्यक्तीं लाभ घेत आहे. केशरी (एनपीएच) चे २८५८९ कार्ड धारक असून १११६७१ व्यक्ती आहे. त्याचप्रमाणे  पांढरे रेशन कार्ड संख्या ७१०९ इतकी असून यामध्ये ३२३७७ व्यक्ती लाभ घेत आहेत. रेशन दुकानदारांनी धान्य वितरण करताना नागरिकांना पावती देणे, नियमानुसार धान्याचे वितरण करणे असे निर्बंध घालण्यात आले असून वितरण करताना नागरिकांची गर्दी होणार नाही याकडे सुद्धा लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

तालुक्यात बिगर कार्ड धारकांची संख्या अंदाजे ६१६९ असून २६३३० यावर अवलंबून आहे. बिगर कार्ड धारकांना दि.१५ मे पर्यंत रेशनचे धान्य उपलब्ध करण्याकरिता मी स्वतः प्रयत्न करणार आहे - आमदार दिलीप बनकर
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख