नारायण राणे यांना कसे अटक करायचे याच्या नाशिक पोलिसांना मिळाल्या सूचना

नाशिक शहर सायबर पोलिस ठाणे येथे आज (ता. 24) नाशिक शहर शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर भिका बडगुजर, रा. नाशिक यांच्याफिर्यादीवरुन गु.र.नं ३०/२०२१ भादवि कलम ५००, ५०५ (२), १५३ व (१) (क) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.
narayan rane.jpg
narayan rane.jpg

नाशिक ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अक्षेपार्ह्य विधान केले होते. या विरोधात नाशिक शहर शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर भिका बडगुजर यांनी नाशिकच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी सामाजिक भावना दुखविणे व समाजात तेढ निर्माण करण्याचा गुन्हा केंद्रीय मंत्री राणे यांच्या विरोधात दाखल केला आहे. त्यानुसार नाशिक शहराचे पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी राणे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यासाठी एक पथक स्थापन केले आहे.

या पथकाला दिलेला आदेश 

नाशिक शहर सायबर पोलिस ठाणे येथे आज (ता. 24) नाशिक शहर शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर भिका बडगुजर, रा. नाशिक यांच्या फिर्यादी वरुन गु.र.नं ३०/२०२१ भादवि कलम ५००, ५०५ (२), १५३ व (१) (क) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.

या गुन्हयातील आरोपी हे केंद्रीय मंत्री नारायण राणे असुन त्यांनी (ता. २३) रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांचे बद्दल बदनामीकारक, व्देषभाव निर्माण करणारी विधाने करून समाजामध्ये शत्रुत्वाची व व्देषाची भावना निर्माण होईल असे विधान केलेले आहे.

या गुन्हयातील आरोपी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या महाड येथील विधानांमुळे महाराष्ट्र राज्यातील तसेच नाशिक शहरातील विविध गटातील सदस्य व व्यक्तींमध्ये तेढ निर्माण होईल, शत्रुत्व व दुष्टपणाची भावना निर्माण होईल आणि या विधानांमुळे सामान्य नागरीक मुख्यमंत्री कुढलेही काम करत असतांना जर त्यांचे सचिवांना काहीही विचारले, तर सामान्य नागरीक त्यांचेवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील अशी दाट शक्यता नाकारता येत नाही.

या गुन्हयात आरोपी भारत सरकारचे मंत्री असुन त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या विरोधात विधान केलेले आहे. गुन्हयाची गंभीरता व्यापकता लक्षात घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तात्काळ अटक करून मा. न्यायालयासमोर उपस्थित करणे आवश्यक असल्याने, एक पोलीस उप आयुक्त दर्जाचा अधिकारी नेमणे उपयुक्त वाटते. नाशिक शहर पोलिस उपआयुक्त (गुन्हे) संजय बारकुंड यांनी एक चमु तयार करून मंत्री नारायण राणे यांना अटक करून न्यालयासमोर उपस्थित करण्याची कार्यवाही करावी. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे शाखा) आनंदा वाघ यांनी करावा.

या गुन्हयात आरोपीस अटक करून न्यायालया समक्ष हजर करणे, गुन्हयाच्या तपासाच्या दृष्टीने व महाराष्ट्र राज्यात व नाशिक शहरात सामाजिक स्वास्थ्यास निर्माण झालेली बाधा दूर होण्याचे दृष्टीने, आरोपीकडून आणखी चिथावणीखोर वक्तव्य होवून इतर अपराधास प्रतिबंध करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थित ठेवणे आवश्यक आहे. यासाठी पोलिस उपायुक्त (गुन्हे) संजय बारकुंड यांनी तपास अधिकारी पोलिस निरीक्षक आनंदा वाघ व अटक करण्यासाठी निवडण्यात आलेल्या चमुचा पुढाकार घेवून मागर्दशन करावे.

गुन्हयातील आरोपी हे राज्यसभाचे सदस्य असल्यामुळे संसदचे Rules of Procedure and Conduct of Business चे Rule 222 A प्रमाणे चेअरमन व उपराष्ट्रपती यांना कळविणे बंधनकारक असल्यामुळे संजय बारकुंड यांनी तपास अधिकारी यांचे मार्फत नारायण राणे यांच्या अटके नंतर उपराष्ट्रपती यांना हिंदी अथवा इंग्रजीमध्ये अटकेबाबत माहिती कळवावी. तसेच या अटकेची माहिती इंन्टेलीजन्स ब्युरो, भारत सरकार, एसआयडी कमिशनर, महाराष्ट्र शासन व संबंधीत जिल्हा दंडाधिकारी व न्यायदंडाधिकारी यांना दयावी.

या संदर्भात सर्व कार्यवाही करतांना आरोपी हे भारत सरकार येथील मंत्री आहेत व  राज्यसभा सदस्य आहेत म्हणुन प्रत्येकक्षणी राजशिष्टाचाराचे पालन करतील आणि हक्कभंगाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता संजय बारकुंड, व तपास अधिकारी आनंदा वाघ तसेच अटक चमुचे सर्व सदस्य बाळगतील, अशा सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com