वर्दळीच्या ठिकाणी अन् भाजप नेत्याच्या पेट्रोल पंपावर बिबट्या शिरल्याने नाशिक झाले अॅलर्ट!

भाजपचे नेते, महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील यांचा पेट्रोल पंप आणि व्यापारी संकुल असलेल्या श्रद्धा मॅाल्सच्या भागात सकाळीसाडे नऊला बिबट्या दिसल्याचे येथील नागरीकांनी सांगीतले. यावेळी येथे बांधकामावर रखवालदार असलेल्या कुटुंबातील महिला व पुरुषांवर त्यांने हल्ला केला​
Leopard Sneaked into Busy Area of Nashik
Leopard Sneaked into Busy Area of Nashik

नाशिक : पेट्रोल पंपावर कर्मचारी ग्राहकांची वाट पहात होते. मात्र ग्राहकांऐवजी तिथे एक असा अनाहुत पाहुणा आला, की त्याला पाहून सगळेच थरथर कापू लागले. पळू लागले. लपु लागले. कारण तिथे आज सकाळी चक्क बिबट्या प्रकटला होता. भाजप नेते सुरेश पाटील यांच्या पेट्रोल पंपाजवळ बिबट्या आला. त्यामुळे सबंध शहर अॅलर्ट झाले आहे.

शहरातील सर्वाधीक वर्दळीचा भाग असलेल्या कॅालेज रोड भागात आज सकाळी बिबट्याने अचानक दर्शन देत नागरीकांची पाचावर धारण बसवली. भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश पाटील यांच्या श्रद्धा पेट्रोल पंपाच्या आवारातच हा बिबट्या शिरला. येथील मजुरांवर त्याने हल्ला केल्याने सबंध शहराचे पोलिस व वन विभाग अलर्ट झाला. आता बिबट्याचा शोध घेतला जात आहे. 

भाजपचे नेते, महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती  सुरेश पाटील यांचा पेट्रोल पंप आणि व्यापारी संकुल असलेल्या श्रद्धा मॅाल्सच्या भागात सकाळी साडे नऊला बिबट्या दिसल्याचे येथील नागरीकांनी सांगीतले. यावेळी येथे बांधकामावर रखवालदार असलेल्या कुटुंबातील महिला व पुरुषांवर त्यांने हल्ला केला. त्यामुळे चांगलीच घबराट पसरली. तातडीने वन विभागाला कळविण्यात आले. पोलिसांना माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने संरक्षक सूट व जाळ्या घेऊन परिसरात बिबट्याचा शोध सुरु केला. 

वस्तीतच लपून बसल्याचा अंदाज

तासाभरानंतरही त्याचा थांगपत्ता लागाल नाही. त्यामुळे तो वस्तीत लपून बसल्याचा अंदाज आहे. येथुन जवळच सावरकर नगर भागात यापुर्वी बिबट्या शिरला होता. तेव्हाही त्याने नागरीकांवर हल्ला केला होता. हा सबंध परिसर बिबट्याच्या वृत्ताने निर्मनुष्य झाला. सर्व नागरीकांनी इमारती व घरे बंद करुन घरातच राहणे पसंत केले. 

बिबट्या ज्या भागात आढळला तो व्यापारी पेठ व सर्वाधिक वर्दळीचा व्यापारी पेठ आहे. येथे बी. वाय के. महाविद्यालयाचा कॅम्पस आहे. तो सध्या कोरोनामुळे बंद आहे. त्याच्या मागे महाराष्ट्र पोलिस अकादमीचा परिसर आहे. अकादमीच्या परिसरात फारशी वर्दळ नसते. मैदानपण आहे. त्यामुळे तेथून हा बिबट्या आला असावा, असा अंदाज आहे. या निमित्ताने शहर मात्र अॅलर्ट झाले आहे. 
... 
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com