Breaking - नाशिक भाजपच्या दोन बड्या नेत्यांचा आज शिवसेना प्रवेश

गिते पुर्वाश्रमीचे मनसेचे नेते. शहरात मनसे रुजविणयात, वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा. मात्र विधानसभा निनडणुकीतील पराभव व राज्यात सत्तांतर होऊन भाजपचे सरकार आल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रेवश केला. आता ते भाजपमध्ये नाराज आहेत
Sunil Bagul - Vasant Gite
Sunil Bagul - Vasant Gite

नाशिक : नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसतो आहे. या पक्षाचे नेते व माजी आमदार वसंत गिते आणि सुनील बागुल हे आज सायंकाळी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड मानली जात आहे. 

गिते पुर्वाश्रमीचे मनसेचे नेते. शहरात मनसे रुजविणयात, वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा. मात्र विधानसभा निनडणुकीतील पराभव व राज्यात सत्तांतर होऊन भाजपचे सरकार आल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रेवश केला. आता ते भाजपमध्ये नाराज आहेत. गेले काही दिवस नाशिकमध्ये गितेंच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु होत्या. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. आज सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख 

माजी महापौर वसंत गिते यांनी `मनसे`ला गुडबाय करीत भाजपवासी होऊन आता पाच वर्षे उलटली. मात्र त्यांनी या नववर्षाच्या पहिल्या दिवशी मिसळ पार्टी ठेवली. तिकडे फिरकू नका असा फतवा मनसेच्या उत्साही पदाधिका-यांनी काढला होता. मात्र मनसेचे ज्येष्ठ पदाधिकारी त्याला ठेंगा दाखवत हजर राहिले. त्यांनी फोटो सेशन केले. त्यामुळे वसंत गिते मनसेमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. 

गितेंनी दिलेल्या मिसळ पार्टीची अनेक अर्थाने राजकीय चर्चा झाली. भाजपमध्ये गिते यांना विरोध करणारा एक गट आहे. त्याची काय भूमिका असणार? आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूीमीवर  श्री. गिते शिवसेनेत जाणार का? अशी चर्चा सुरु होती. मात्र खरी चर्ची घडली होती ती ‘पार्टीला जाल, तर याद राखा़,’ असा सज्जड दम मनसेतील तरुण तुर्क पदाधिका-यांनी काढला होता. मात्र, असा फतवा काढूनही गिते यांच्या मिसळ पार्टीला मनसेचे सर्वाधिक पदाधिकारी उपस्थित राहिले होते. पण त्यांनाही गितेंनी चकवा दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com