नाशिक : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मला बोलण्यात अजिबात स्वारस्य नाही. कारण त्यांनी तोंड उघडल्यावर फक्त घाणच बाहेर पडते. कोकणातील जनतेने त्यांना केव्हाच त्यांची जागा दाखवली आहे. कोकणात त्यांचे अस्तित्व कधीच संपलं, असे शिवसेना नेते, माजी मंत्री भास्कर जाधव यांनी सांगितले.
श्री. जाधव यांनी आज नाशिकचा खासगी दौरा केला. यावेळी ते म्हणाले, शिवसेनेला ग्रामीण भागात मोठा जनाधार आहे. ते भाजपची संस्कृती विसरून बेछूट आरोप करताय हे चुकीचं आहे. शरद पवार यांच्याविषयीचे वक्तव्य हा भाजपचा बेशरमपणा आहे. हे असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते करताय हे अत्यंत अयोग्य आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी संबंधीत प्रश्नावर ते म्हणाले, कोकणात भाजपहा पक्ष नावाला शिल्लक नाही. भाजपला एकाही गावात यश आलेले नाही. कोकणात भाजपनं मुसंडी मारलेली नाही. याविषयीचा जो दावा केला जातो तो निरर्थक आहे. राज्यात प्रत्येक ठिकाणी फक्त महाविकास आघाडीलाच यश मिळाले आहे.
शेतक-यांसाठी वेळ नाही
श्री. जाधव म्हणाले, दिल्लीत शेतकरी नव्या कृषी विधेयकांविरोधात गेेल पन्नास दिवस आंदोलन करीत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना या शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. त्याचा मोठा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला. महाविकास आघाडी एक असल्यानं हा फायदा झाला. निवडणुक जवळ आली की एकत्रित होण्याचा विचार महाविकास आघाडी करेल. औरंगाबाद शहराचे नामांतर हा फक्त शिवसेनेचा विषय नाही.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या विषयावर पडदा पडला आहे असे श्री. जाधव म्हणाले. ते म्हणाले, तक्रारदार महिला रेणू शर्मा यांचा 1997 मध्ये शरीरसंबंध केल्याचा आरोप केला आहे. त्याचा साक्षात्कार तेवीस वर्षानंतर का झाला ?. मी कोणाचे समर्थन करत नाही. मात्र यावर समाजप्रबोधन व्हायला हवं.
...

