मंत्री एकमेकांची खाती कमी करताहेत; तर कैदी कारागृहातून पळताहेत 

राज्यातील त्रिशंकू सरकारमधील मंत्र्यामध्ये बेबनाव आहे. एकमेकांची खाती कमी करण्यातच त्यांचा अधिक वेळ जात आहे. जनतेकडे लक्ष देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कोणत्याही मंत्र्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे आता राज्यातील कायदा व सुव्यवस्थाही धोक्यात आली आहे.
Ministers reduce each other's accounts; The prisoners are escaping from the prison
Ministers reduce each other's accounts; The prisoners are escaping from the prison

जळगाव : ‘‘राज्यातील त्रिशंकू सरकारमधील मंत्र्यामध्ये बेबनाव आहे. एकमेकांची खाती कमी करण्यातच त्यांचा अधिक वेळ जात आहे. जनतेकडे लक्ष देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कोणत्याही मंत्र्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे आता राज्यातील कायदा व सुव्यवस्थाही धोक्यात आली आहे. कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून कैदी पळून जाण्याच्या घटना घडत आहे. ही अत्यंत लाजीरवाणी घटना असून राज्यातील जनतेची सुरक्षा धोक्यात आली आहे,’’ असा हल्ला राज्याचे माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे जळगावचे नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. 

जळगाव येथील जिल्हा कारागृहातून आज (ता. २५ जुलै) सकाळी तीन कैद्यांनी पलायन केले. सुरक्षा रक्षकांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांनी मुख्य प्रवेशद्वारातून पळ काढला आहे. या घटनेबाबत बोलताना गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, राज्यात काय चाललंय, हेच कळत नाही. कारागृहात पिस्तूल आले कुठून, हाच प्रश्‍न आहे. 

राज्याच्या सरकारमधील मंत्र्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचा हा परिणाम आहे. तीन पक्षाच्या या मंत्र्यांमध्येच समन्वय नाही. त्यामुळे प्रशासनावर ते वचक कसा ठेवणार, हाच खरा प्रश्‍न आहे. त्यामुळे प्रशासनातले अधिकारीही बिनधास्त असतात. त्यांच्यावर कोणाचाच अंकुश नसतो. त्यामुळे ते आपली कामेही करीत नाहीत. अशीच परिस्थिती राहिल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे, अशी भीतीही महाजन यांनी व्यक्त केली. 

राज्याची स्थिती बिकट 

राज्याची स्थिती अत्यंत बिकट झाल्याचे दिसत आहे. राज्याची अशी परिस्थिती कधीच नव्हती, असे मत व्यक्त करून महाजन म्हणाले की, राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्ये नाराजी आहे, त्याचा परिणाम अधिकाऱ्यांच्या कामावर होत आहे. कोणत्याच विभागातील अधिकारी कामे करण्यास तयार नाहीत. 

शेतकऱ्यांना आज खते मिळत नाहीत. त्यामुळे हंगाम हातचा जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात ‘कोरोना’ची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, कोणताही मंत्री राज्यात फिरण्यास तयार नाही. विरोधी पक्षाचे नेते व आमदार फिरतात, तर त्यांच्या बैठकीला जाऊ नये, असा आदेश राज्य सरकारतर्फे काढले जातात. हे अत्यंत चुकीचे आहे. 

सरकारमधील तीनही पक्षाच्या मंत्र्यांचे लक्ष जनतेकडे नाही, तर एकमेकांची खाती कमी करण्यात आहे. त्यामुळे राज्याचे मोठे नुकसान होत आहे, अशी शब्दांत महाजन यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com