महाराष्ट्र देशातील सर्वात जास्त लसीकरण झालेले राज्य

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले. त्यांचाच वारसा घेवून शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा, त्यांची फसवणूक होणार नाही यादृष्टिने प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी राज्य शासन सदैव कटीबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
Ajit Pawar
Ajit Pawar

नाशिक : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले. त्यांचाच वारसा घेवून शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा, त्यांची फसवणूक होणार नाही (Farmers shall not be cheat anyway) यादृष्टिने प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी राज्य शासन सदैव कटीबद्ध आहे, (Government is bond to Farmers welfare) असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy. Cm Ajit Pawar) यांनी सांगितले. 

देवळाली विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे भुमिपुजन  उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्याच्या विकास कामांसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास जलद गतीने विकास होण्यास मदत होईल. याकरिता सर्वांनी जातीने लक्ष दिल्यास कामाची गुणवत्ता टीकून राहण्यास मदत होईल. आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या जिद्द व चिकाटीने आपल्या विधानसभा मतदारसंघात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेवून देवळाली विधानसभा मतदारसंघात प्रस्तावित 15 कोटींच्या क्रिडा संकुलाच्या कामासाठी 5 कोटी निधी त्वरीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. क्रिडा संकुलाचे काम सुरु झाल्यानंतर उर्वरीत निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

आरोग्य विभागात कोरोना काळात निधीची कमतरता पडू नये यासाठी अधिवेशनात ३०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, मदत व पुनर्वसन विभाग या विभागांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. 

ते पुढे म्हणाले, देशात सर्वात जास्त लसीकरण राज्यात झाले आहे. यापुढेही जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी हाफकीन या संस्थेला लस निर्मितीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. यावेळी कोरोना काळात रुग्णांची अथक सेवा करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचारी व डॉक्टरांना डॉक्टर दिना निमित्त शुभेच्छा देवून, सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व तिसऱ्या लाटेत स्वत:सोबत आपल्या कुटुंबाची व बालकांची काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले आहे. 

यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार सरोज अहिरे, दिलीप बनकर, नितीन पवार, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव, सय्यद पिंपरीचे सरपंच मधुकर ढिकले यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com