विधानपरिषद निवडणूक - भाजप चौथा उमेदवार न देता 'झाकली मूठ....' ठेवणार?

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या २१मे रोजीनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपकडे जादा मते आहेत. त्यांनी चौथा उमेदवार दिल्यास पाठींबा देणारे आमदार नेमके किती? आणि ते घटले तर नाही हे स्पष्ट होईल. त्यामुळे ही निवडणूक देवेंद्र फडणवीसांसाठी ती परिक्षा ठरेल असे बोलले जाते.
What BJP Will decided about forth candidate in Council Election
What BJP Will decided about forth candidate in Council Election

नाशिक : विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेची नावे निश्‍चित आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तिघे निवृत्त झाले असले तरी त्यांच्याकडून दोनच उमेदवार दिले जातील. त्यांची नावे उद्या सायंकाळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडून जाहीर होण्याची शक्‍यता असल्याचे पक्षाच्या गोटातून सांगण्यात आले आहे. 

या निवडणुकीत भाजपकडे जादा मते आहेत. त्यांनी चौथा उमेदवार दिल्यास पाठींबा देणारे आमदार नेमके किती? आणि ते घटले तर नाही हे स्पष्ट होईल. त्यामुळे निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी ती परिक्षा ठरेल असे बोलले जाते. 

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होत आहे.त्यात शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची नावे निश्‍चित आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हेमंत टकले (नाशिक), किरण पावसकर (मुंबई) आणि आनंद ठाकूर (पालघर) हे तिघे निवृत्त झाले आहेत. मात्र, सध्या त्यांची सदस्यसंख्या घटल्याने दोन सदस्य निवडून येऊ शकतील. उमेदवारांचा निर्णय सर्वस्वी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. उद्या (ता.४) सायंकाळपर्यंत ते आपला निर्णय जाहीर करतील अशी शक्‍यता आहे. 

चौथा उमेदवार भाजप देण्याची शक्यता

सध्याचे चित्र पाहता ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न आहेत. निवडणुकीत एका सदस्यासाठी पहिल्या पसंतीच्या एकोणतीस आमदारांच्या मतांची आवश्‍यकता आहे. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य विजयी होतील. भारतीय जनता पक्षाचे १०५ व त्यांना पाठींबा देणारे अशा १०५ सदस्यसंख्येमुळे त्यांच्या तीन जागा निवडून येतील. उर्वरीत तेरा मते जादा आहेत. काही अपक्ष व अन्य पक्षांनीही त्यांना पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून चौथा उमेदवार दिला जाण्याची शक्‍यता आहे. 

त्यासाठी चाचपणी केली जात आहे. लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत आहे. त्यांना देखील धर्मनिरपेक्ष विचाराचे पाच आमदार पाठींबा देऊ शकतात. याशिवाय या तिन्ही पक्षांत सध्या अतिशय चांगले ट्युनींग आहे. अशा स्थितीत निवडणूक झाल्यास भारतीय जनता पक्षाला नेमका किती सदस्यांचा पाठींबा आहे, हे उघड होईल. त्यातून पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे 'कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक बिनविरोध करुन 'झाकली मुठ...' ठेवण्याकडे नेत्यांचा कल आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com