नाशिकमध्ये दारु विक्री होणार शुक्रवारपासून मात्र रात्रभरात झाले लक्षावधींचे 'अॅडव्हान्स बुकिंग'!

'कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर शहरात बहुप्रतिक्षीत मद्यविक्रीची दारे उद्यापासून खुली होत आहे. अर्थात मद्यविक्री होईल मात्र थेट दुकानात गेल्यास मद्य मिळणार नाही. मद्य खरेदीसाठी व्हाटस्अॅपद्वारे मागणी नोंदवावी लागेल
Advance Booking for Liquor in Nashik Started
Advance Booking for Liquor in Nashik Started

नाशिक : 'कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर शहरात बहुप्रतिक्षीत मद्यविक्रीची दारे उद्या (शुक्रवार)पासून खुली होत आहे. अर्थात मद्यविक्री होईल मात्र थेट दुकानात गेल्यास मद्यमिळणार नाही. मद्य खरेदीसाठी व्हाटस्अॅपव्दारे मागणी नोंदवावी लागेल. त्याला दुकानदार स्विकृती देईल. अशा स्विकृती मिळालेल्या ग्राहकांना ऑनलाईन टोकन क्रमांकानुसार दिलेल्या वेळेतच खरेदी करणे शक्‍य होईल. गंमत म्हणजे दुकाने उद्या सुरु होणार आहेत. मात्र लक्षावधींचे 'अॅडव्हान्स बुकिंग' काल रात्रीच झाली आहे. 

मुंबई, पुणे शहरात प्रतिष्ठीत सस्था, प्रकल्प आपली उत्पादने निमंत्रण दिलेल्या ग्राहकांशिवाय इतरांना विक्री करत नाही. त्याला 'बुकींग ऑन इनव्हीटेशन' अर्थात निमंत्रणावर विक्री अशा शब्दप्रयोग केला जातो. नाशिकमध्ये त्याची तंतोतंत स्विकार झाला आहे. मद्यविक्रीसाठी. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने शहरात सलग बेचाळीस दिवस दारुची दुकाने, हॉटेल्स, बार बंद होती. त्यामुळे सोमवारी कंटोनमेंट झोन बाहेरील मोजकी दुकाने सुरु झाली, तेव्हा खेरदीसाठी झुंबड उडाली. त्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे चार तासांतच पोलिसांनी दुकाने बंद केली. आता ही दुकाने उद्या (ता.८) पुन्हा सुरु होणार आहेत. 

मात्र यापुर्वीचा गोंधळ टाळण्यासाठी व्हाॅटस्‌अॅपद्वारे ग्राहकाला आपली मागणी नोंदवावी लागेल. ती मागणी दुकानदाराने स्विकारल्यावर ते तुम्हाला वेळ व टोकन नंबर कळवतील. त्या अर्धा तासाच्या स्लॉटमध्येच तुम्हाला ती खरेदी करात येईल. ती वेळ टळल्यास नवी मागणी नोंदवावी लागेल. एव्हढ्या अटी असल्या तरीही मद्यप्रेमींना त्याचा अजिबात अडथळा वाटलेला नाही. विक्री उद्यापासून असली तरी शहरातील विविध दुकानांत लाखोंच्या ऑर्डर काल रात्रीच नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मद्यविक्रीसाठी तरी सध्या 'अच्छे दिन' म्हटल्यास वागवे नाही. 

बेशिस्तीमुळे अवघ्या दोन तासांत करावी लागली दुकाने बंद

कोरोना विषाणूमुळे बंद असलेली मद्यविक्री पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने काढलेल्या आदेशानुसार शुक्रवारपासून विक्रीस सुरवात होणार आहे. परवानाधारक सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत मद्याची विक्री करू शकणार आहेत. त्यासाठी विविधनियम केले आहेत. परंतु, नियमांचे उल्लंघन आणि तळीरामांची गर्दी यामुळे विक्रेत्यांवर अवघ्या दोन तासांत दुकाने बंद करण्याची नामुष्की ओढावली होती. त्यामुळे असा प्रकार टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने टोकन अथवा कूपनचा पर्याय निवडल्याची चर्चा होती. 

नव्या आदेशात मालेगाव महापालिका, शहरातील कंटेन्मेंट झोन, तसेच महापालिका, नगर परिषद हद्दीतील मॉल्स, बाजार संकुल आणि बाजारातील मद्यविक्रीची दुकाने वगळून उर्वरित भागातील दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विक्रेत्यास यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करावे लागणार आहे. या सूचनाचे पालन होईल, असे हमीपत्र देणे बंधनकारक असणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com