जळगावात माजी महापौराच्या मुलाची हत्या - Jalgaon ex Mayors son murdered | Politics Marathi News - Sarkarnama

जळगावात माजी महापौराच्या मुलाची हत्या

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

येथील शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीजवळ  माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव  राकेश अशोक सपकाळे वय २८ याचा बुधवारी रात्री 11:30 च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे

जळगाव :- येथील शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीजवळ  माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव  राकेश अशोक सपकाळे वय २८ याचा बुधवारी रात्री 11:30 च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस  कर्मचारी माहिती घेत आहेत.

राकेश अशोक सपकाळे याच्यावर अज्ञात लोकांनी अज्ञात  कारणावरून वाद घालून धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती मिळाली. त्याला गंभीर अवस्थेत  जळगावातील पारखनगरातील ओम क्रिटिकल केअर सेंटर मध्ये उपचारासाठी आणण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख