मी राजकारणातला कुस्तीपटू; बाहेर काढण्यात, ओढण्यात पारंगत! गिरीश महाजनांची टोलेबाजी

स्ती हा विषय मला नवीन नाही. मी कुस्तीसह कबड्डी व खो-खोचा उत्कृष्ट खेळाडू आहे. कोणाला बाहेर काढायचे व कोणाला ओढायचे यात मी पारंगत असल्याने मी राजकारणातला कुस्तीपटू आहे असा खोचक टोला माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीष महाजन यांनी लगावला.
मी राजकारणातला कुस्तीपटू; बाहेर काढण्यात, ओढण्यात पारंगत! गिरीश महाजनांची टोलेबाजी
Girish Mahajan

चाळीसगाव  : कुस्ती हा विषय मला नवीन नाही. मी कुस्तीसह कबड्डी व खो-खोचा उत्कृष्ट खेळाडू आहे. कोणाला बाहेर काढायचे व कोणाला ओढायचे यात मी पारंगत असल्याने मी राजकारणातला कुस्तीपटू आहे असा खोचक टोला माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीष महाजन यांनी लगावला. ते शनिवारी (ता. ३१) रोजी घाटरोडस्थित नगरसेवक अण्णा कोळी पहेलवान व्यायाम शाळेच्या भूमीपूजनाच्या प्रसंगी बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हाप्रमुख उमेश गुंजाळ, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष शिवाजी राजपूत, उद्योजक योगेश अग्रवाल, आमदार रमेश पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, राष्ट्रीय विद्यालयाचे संचालक विश्वास चव्हाण, सदानंद चौधरी, पत्रकार किसनराव जोर्वेकर, कुस्ती मल्ल विद्या संघटनेच्या महिला अध्यक्षा चित्रा मोरे, सिद्धांत कोळी, सौरभ कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

सर्वांत जास्त युवाशक्ती भारतात आहे; परंतु युवाशक्ती ही व्यसनाधिनतेकडे वळाली असून, यामुळे ते वाया गेले आहेत. परंतु, आजच्या तरुणांनी खरा पुरूषार्थ हा व्यसनाधिनतेपेक्षाही व्यायामात दाखवावा, असे आवाहन आमदार महाजन यांनी केले. कुस्तीपटूंसाठी पेन्शन व नोकरीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. साधुसंतांबरोबरच चाळीसगाव तालुक्याची भूमी ही पहेलवानांची भूमी म्हणून ओळखली जाते. व्यायामशाळा चालू करण्यामागे माझे हेच उद्दिष्ट असून, तरुणांना अवैध मार्गाकडे न वळता त्यांना कुस्तीत पारंगत करण्यासाठी ही व्यायामशाळा उघडत असल्याचे मत नगरसेवक अण्णा कोळी यांनी केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून व्यायामशाळेसाठी निधी देण्याची ग्वाही दिली.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in