The government formed by Sharad Pawar will fall by his will: Anil Gote | Sarkarnama

शरद पवार यांनी स्थापन केलेले सरकार त्यांच्या इच्छेनेच पडेल....

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 मे 2020

 महाराष्ट्रातील सत्ता भाजपाच्या हातातून हिसकावून घेतल्यामुळे भाजपा नेते अस्वस्थ झाले आहेत.

पुणे  :  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार शरद पवार यांनी स्थापन केले आहे. हे सरकार शरद पवार यांच्या इच्छेनेच पडेल, असे माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे.  महाराष्ट्रातील सत्ता भाजपाच्या हातातून हिसकावून घेतल्यामुळे भाजपा नेते अस्वस्थ झाले आहेत. यामुळे भाजपा नेते सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्न असफल होईल, असे अनिल गोटे यांनी सांगितलेय याबाबत गोटे यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. 

''सत्ता गेल्याने कारण नसताना बरगळण्याची आणि वाचाळपणाची भाजपच्या नेत्यांची सवय जूनीच आहे. राज्यात भाजपला रडतरकडत केवळ 105 जागांवर समाधान मानावे लागले. 'बारामतीचा अभेद गड आम्ही हिसकावून घेणार,' अशी वल्गना भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील, गिरीष महाजन करीत होते. आज भाजपच्या कोणत्याही नेत्याला जनता गांभीर्याने घेत नाही. 

 

राजकीय सभ्यता म्हणून काही संकेत असतात. पण सध्या बालिशपणाचे दर्शन भाजप देशाला घडवीत आहे, '' असे गोटे यांनी म्हटले आहे. "महाविकास आघाडीचे सरकार राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांनी प्रत्यक्षात आणले आहे. जोपर्यंत हे सरकार चालावे, अशी शरद पवार यांची इच्छा आहे, तोपर्यंत हे सरकार चालेल. महाविकास आघाडी सरकारला धोका नाही," असा विश्वास अनिल गोटे यांनी व्यक्त केला आहे.  

 

भाजप हा 'वाचाळांचा पक्ष'

आम्ही विरोधी पक्षाची भूमिका योग्य रितीने पार पाडू, सामान्य जनतेचे प्रश्न मांडून सरकारला सहकार्य करू, असे सांगणाऱ्या भाजपच्या नेत्यांची वागणूक सध्या वेगळीच आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, पण पहिल्या दिवसापासून भाजपने 'हे सरकार चालणार नाही, एक महिन्यात पडेल,' असे सांगत अक्कलेचे तारे तोडले. भाजप हा 'वाचाळांचा पक्ष' आहे, असा चिमटा गोटे यांनी आपल्या पत्रात भाजपला काढला आहे.     

ही पण बातमी वाचा : फेकाफेकीसाठी तिघे लागतात  : फडणवीस

 मुंबई ः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेला जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब या तीन मंत्र्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. त्यालाही फडणवीस यांनी तातडीने उत्तर दिले. ते म्हणाले की, तीन मंत्र्यांनी एकत्रित येऊन पूर्णत: विसंगत माहिती दिली आणि माझी पत्र परिषद खोटी ठरविण्याचा प्रयत्न केला. माझ्या पत्रपरिषदेला उत्तर देण्यासाठी जेवढ्या बैठका घ्यातल्या, तेवढ्या बैठका कोरोनाशी लढण्यासाठी घेतल्या असत्या, तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते. सत्य सांगायला एकच व्यक्ती पुरे असते, फेकाफेकीसाठी तीन लोक लागतात, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख