Gold price at Rs 50,000 per ten grams | Sarkarnama

सोन्याला 50 हजारांची झळाळी 

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 2 जुलै 2020

श्रीमंतापासून गरिबांपर्यंत सर्वाचेच आकर्षण असलेल्या सोन्याला लॉकडाउनच्या काळातही तेजीची चकाकी आली आहे. दहा ग्रॅम (एक तोळा) खरेदीचा भाव जळगाव बाजारात 49 हजार 200 असून तीन टक्के जीएसटीसह हा भाव 50 हजार 600 वर जात आहे.

जळगाव : श्रीमंतापासून गरिबांपर्यंत सर्वाचेच आकर्षण असलेल्या सोन्याला लॉकडाउनच्या काळातही तेजीची चकाकी आली आहे. दहा ग्रॅम (एक तोळा) खरेदीचा भाव जळगाव बाजारात 49 हजार 200 असून तीन टक्के जीएसटीसह हा भाव 50 हजार 600 वर जात आहे. गेल्या अनेक वर्षांत लॉकडाउनच्या काळात मंदी असताना सोन्याच्या दराने भाववाढीचा उच्चांक गाठला आहे. 

सोन्याच्या खरेदी आणि विक्रीसाठी राज्यात जळगाव बाजार म्हत्वाचा मानला जातो. या ठिकाणी खरेदीसाठी राज्यासह परराज्यातील नागरिकही येत असतात. जळगाव बाजारात आजच्या (ता. 2 जुलै) दुपारी सोन्याचा भाव 49 हजार 200 होता. तीन टक्के जीएसटी लावल्यास तो भाव 50 हजार 676 होत आहे. सोन्याचा दर प्रथमच पन्नास हजार रुपयांपर्यंत गेला आहे. विशेष म्हणजे "लॉकडाऊन' असतानाच सोन्याच्या दरात वाढ होत आहे. 

"कोरोना' संसर्गामुळे भारतात तीन महिन्यांपूर्वी "लॉकडाउन' करण्यात आले होते. या काळात सोन्याचा दर 41 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम असा होता. आज राज्यात काही अंशी लॉकडाउन शिथील झाल्यामुळे तब्बल 75 दिवसांनी सोन्याचा भाव 47 हजार झाला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात वाढ होतच राहिली. विशेष म्हणजे "लॉकडाउन'मुळे बाजारात मंदी आहे. 

वाढत्या दराबाबत माहिती देताना तज्ज्ञांनी सांगितले, की सोन्याची सध्या आयात बंद आहे, या शिवाय शेअर बाजाराच्या गुंतवणुकीतही मंदी आहे. अशा स्थितीमध्ये गुंतवणूकदारांचा कल सोन्यात गुंतवणूक करण्याकडे अधिक वाढला आहे. या शिवाय सर्व सामान्य माणूसही आज सोने खरेदीत गुंतवणूक करीत आहे. कारण अडचणीच्या काळात मोड केल्यास केव्हाही तातडीने पैसे उपलब्ध होतात. 

जळगावातील प्रसिद्ध रतनलाल सी बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांनी सोन्याच्या वाढत्या दराबाबत सांगितले, की सध्या जगभरात कोरोना महामारीमुळे अस्थिर परिस्थिती आहे. तरीही जगभरात सोन्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात वाढ होत असल्याचे आहे. सोन्याचे भाव वाढले असले तरी भविष्यात त्याची मागणी वाढेल, असा विश्‍वास बाफना यांनी व्यक्त केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख