कोरा धनादेश द्या अन् निवडणूक लढा!

ग्रामपंचायतीत पारदर्शी कारभार असेल तरच गावाचा कायापालट होऊ शकतो, यासाठी पॅनलप्रमुख माजी सरपंच महेंद्र पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील, माजी उपसरपंच डी. ए. धनगर, अमित पाटील व माजी सरपंच अरुण मोरे यांनी अनोखी शक्कल लढवली आहे.
Give Black Cheque and Fight Election New Funda in Amalner Election
Give Black Cheque and Fight Election New Funda in Amalner Election

अमळनेर  : ग्रामपंचायत ही ग्रामस्तरावरची ‘मिनी मंत्रालय’ असते. या मंत्रालयात योग्य उमेदवार निवडून आल्यास गावाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. याच पार्श्वभूमीवर शिरुड (ता. अमळनेर) येथे स्वच्छ व पारदर्शी कारभार ग्रामपंचायतीत व्हावा, तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एक अनोखी शक्कल लढविण्यात आली आहे. जो इच्छुक उमेदवार सद्य:स्थितीत निवडणूक रिंगणात आहे, त्या उमेदवाराकडून पॅनलप्रमुखांनी चक्क कोरा धनादेश घेतला आहे. ‘कोरा धनादेश द्या अन् निवडणूक लढा’ या अनोख्या सूत्राने या निवडणुकीत एक वेगळाच रंग आणला आहे.

शिरुड (ता. अमळनेर) येथे ग्रामपंचायतीत ११ जागांपैकी सुमारे चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. ७ जागांसाठी जनता जनार्दन पॅनल व प्रगती पॅनलमध्ये सरळ लढत असून, १५ उमेदवार निडणुकीच्या रिंगणात आहे. ग्रामपंचायतीत पारदर्शी कारभार असेल तरच गावाचा कायापालट होऊ शकतो, यासाठी पॅनलप्रमुख माजी सरपंच महेंद्र पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील, माजी उपसरपंच डी. ए. धनगर, अमित पाटील व माजी सरपंच अरुण मोरे यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. 

जनता जनार्दन पॅनलच्या वतीने प्रत्येक उमेदवाराकडून ग्रामपंचयतीच्या नावाने एक कोरा धनादेश घेतला आहे. ग्रामपंचायत सदस्य अथवा सरपंच या पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर जर कोण्या सदस्याने अफरातफर केली तर पॅनल प्रमुख या नात्याने त्यांच्याकडून दुप्पट रक्कम भरून वसूल करण्यात येईल. यासाठी पॅनलप्रमुखांनी लढविलेली ही अनोखी शक्कल ही चर्चेचा विषय ठरत आहे. या कृतीमुळे कोणताही सदस्य आपल्या कार्यकाळात अफरातफर करणार नाही, तसेच भ्रष्टाचाराला वाव देणार नाही पर्यायाने लोकाभिमुख काम होऊन गाव प्रगतिपथावर जाईल, अशी शाश्वती पॅनल प्रमुख तथा माजी सरपंच महेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.

हिंदू - मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन
शिरुड येथे सध्या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत सुरवातीलाच हिंदू - मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन शिरूडकरांनी घडविले आहे. गावाची लोकसंख्या सुमारे पाच हजार आहे. यात केवळ खाटीक समाजाचे एकच घर आहे. मात्र तरी सुद्धा वार्ड क्रमांक एकमध्ये सर्वसाधारण महिलामधून अफसाना अकबर खाटीक यांना बिनविरोध निवडून दिले. या राष्ट्रीय एकात्मतेच्या कृतियुक्त संदेशाने खाटीक परिवार पूर्णपणे भारावला आहे. विशेष म्हणजे, याच वॉर्डातून जनता जनार्दन पॅनलच्या अनिता दिलीप पाटील तर प्रगती पॅनलकडून नरेंद्र राजाराम पाटील व सुरेखा वसंत पाटील या दोन अशा चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com