शिक्षकांच्या ऑफलाइन बदल्यांना पंकजांपाठोपाठ जयकुमार रावलांचाही विरोध 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करुन तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बदल्यांमागे होणारी आर्थिक देवाण-घेवाण रोखली होती. पण, सद्यःस्थितीत या सरकारने शिक्षकांच्या आंतर जिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या या ऑफलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इ-मेलद्वारे पत्र पाठवून केली आहे.
Following Pankaj, Jayakumar Rawal also opposed the offline transfer of teachers
Following Pankaj, Jayakumar Rawal also opposed the offline transfer of teachers

नंदुरबार : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करुन तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बदल्यांमागे होणारी आर्थिक देवाण-घेवाण रोखली होती. पण, सद्यःस्थितीत या सरकारने शिक्षकांच्या आंतर जिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या या ऑफलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इ-मेलद्वारे पत्र पाठवून केली आहे. 

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम वसंत काळे, राज्य कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण बागल, जिल्हा संघटनमंत्री राकेश आव्हाड यांच्या शिष्टमंडळाने आमदार जयकुमार रावल यांची प्रत्यक्ष भेटून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने होण्याबाबत निवेदन दिले. निवेदनाची दखल घेत आमदार रावल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करण्याबाबत पत्र देऊन मागणी केली असल्याची माहिती राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे यांनी दिली आहे. 

राज्य सरकारचे ग्रामविकास विभागाने १५ जुलैस आदेश काढून राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील कार्यरत शिक्षकांच्या बदल्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या सरकारी निर्णयानुसार ३१ जुलै २०२० पूर्वी ऑनलाइन पद्धतीने कराव्यात, असे निर्देश दिले आहेत. परंतु ऑफलाइन पद्धतीने बदल्या केल्यास त्यात मानवी हस्तक्षेप होऊन गैरप्रकार होऊ शकतात. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या या ऑनलान पद्धतीनेच होणे गरजेचे असल्याबाबत निवेदनाद्वारे सरकारला अवगत करण्यात आल्याची माहिती आमदार रावल यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला दिली. 

ऑनलाइन जिल्हांतर्गत बदल्या करत असताना २०१८-१९ व २०१९-२० च्या बदल्यांमध्ये रॅण्डम राऊंडमध्ये व विस्थापित बदल्यांमध्ये गैरसोय झालेल्या शिक्षकांना ऑनलाइन बदल्यात विनाअट प्राधान्याने बदलीची तरतूद असावी. तसेच, महिला शिक्षकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. 

राज्य सरकारने फेब्रुवारी २०२० मध्ये राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणावर पुनर्विचार करुन निर्णय घेण्यासाठी पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने राज्यस्तरावर आणि विभागीय स्तरावर शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. या चर्चेत राज्यातल्या सर्व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या सर्व प्रतिनिधींनी जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच कराव्यात अशी, एकमुखी मागणी केली होती.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com