‘बीएचआर’प्रकरण फडणवीस सरकारने दडपले : एकनाथ खडसे - Eknath Khadse Allegation on BJP Government | Politics Marathi News - Sarkarnama

‘बीएचआर’प्रकरण फडणवीस सरकारने दडपले : एकनाथ खडसे

कैलास शिंदे
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

राज्यात फडणवीस यांचे सरकार असतांना त्यांनी हे प्रकरण दडपले होते, मात्र महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू केल्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळेल, त्यामुळे या सरकारचे आपण अभिनंदन करत आहोत, असे प्रतिपादन माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ‘सरकारनामा’शी बोलतांना केले.

जळगाव :  ‘बीएचआर’पतसंस्थेतील ठेवीदारांची फसवणूक करण्यात आलेल्या प्रकरणी सध्या आर्थिक गुन्हे अन्वेशन विभागाकडून चौकशी सुरू असून काही जणांना अटकही करण्यात आली. हा अत्यंत मोठा गुन्हा असून यात शेकडो जण गुंतलेले आहेत.राज्यात फडणवीस यांचे सरकार असतांना त्यांनी हे प्रकरण दडपले होते, मात्र महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू केल्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळेल, त्यामुळे या सरकारचे आपण अभिनंदन करत आहोत, असे प्रतिपादन माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ‘सरकारनामा’शी बोलतांना केले.

याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, ‘बीएचआर’पंतसंस्थेत हा सर्व संगनमताने केलेला गुन्हा आहे. जितेंद्र कंडारे यांची अवसायक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर यात ठेवीदारांच्या ठेवी देण्यात मोठा अपहार झाला आहे. सन २०१८ मध्ये याबाबत ठेवीदारांनी माझ्याकडे तसेच खासदार रक्षा खडसे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. ॲड. किर्ती रविंद्र पाटील यांनी या फसवणूकीबाबत सविस्तर माहितीही दिली होती. याबाबत आपण राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  सरकारकडे याबाबत तक्रार केली होती. मात्र,  त्यावेळी त्यांनी या प्रकरणाबाबत काहीही कारवाई केली नाही, त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आपण केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांच्याकडे तक्रार केली. त्यांची आपण भेट घेतली होती. त्यानंतर वारंवार या प्रकरणाचा पाठपुरावा केला.राज्यात सरकार बदलल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले, या सरकारने या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू करून काही जणांना अटकही केली आहे. त्यामुळे आपण या सरकारचे अभिनंदन करीत आहोत.

संघटीत गुन्हेगारी
‘बीएचआर’ठेवीदारांचया ठेवी देण्याबाबतच्या गैरव्यवहाराची ही संघटीत गुन्हेगारी आहे.असे सांगून खडसे म्हणाले,  ''यात एक दोन नव्हे तर शेकडो जण गुंतलेले आहेत. कर्जदारांच्या मालमत्ता विक्री, यातही मोठे रॅकेट आहे.  ठेवीदारांच्या ठेवी अदा करतांना तयार झालेले दलाल,आता पोलीस चौकशीत सर्व माहिती बाहेर येईलच. यात कोणकोण अडकले आहेत,त्याची सर्व माहिती सविस्तरपणे बाहेर येईल.''

पत्रकार परिषद घेणार
‘बीएचआर’ठेवीदार प्रकरणी पोलीसांनी छापे टाकले आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. असे सांगून खडसे म्हणाले, ''चौकशी सुरू असल्याने आपण आता काहीही बोलणार नाही, मात्र दोन दिवसांनी आपण याबाबत पत्रकार परिषद घेवून सर्व माहिती जनतेसमोर आणणार आहोत."
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख