खासदार रक्षा खडसेंनी केले नाथाभाऊंचे औक्षण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे आज मुक्ताईनगर येथे दाखल झाले त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांचे औक्षण केले.
Ekanath Khadse Welcomed by BJP MP Raksha Khadse
Ekanath Khadse Welcomed by BJP MP Raksha Khadse

मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे आज मुक्ताईनगर येथे दाखल झाले त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांचे औक्षण केले. 

मुंबई येथे भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर  खडसे आज मुक्ताईनगर येथे पोहचले. कोथळी या त्यांच्या गावी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचे औक्षण करुन स्वागत केले.यावेळी खडसे यांच्या पत्नी पत्नी मंदाकिनी खडसे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्तीगत कारणामुळे भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला नाथाभाउंच्या निर्णयाचे आम्हाला पक्ष म्हणून दुःख आहे, अशी प्रतिक्रिया खडसे यांच्या भाजप राजीनाम्यानंतर रक्षा खडसे यांनी व्यक्त केली होती. ''मी भाजपकडून निवडून आले आहे. भाजपचा उमेदवार म्हणून लोकांनी मला निवडून दिले आहे. मी भाजपतच राहणार असून पक्षाचे काम करत राहणार आहे. पक्ष जो काही जबाबदारी देईल, ती मी पूर्ण करणार आहे,'' असे सांगत आपण पक्ष सोडणार नसल्याचे रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, समाजातील अन्यायकारक व घटनाबाह्य गोष्टींचे निर्दालन करावयाचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ  खडसे यांनी येथे केले. मुंबई येथे भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आज ते जळगावात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा आज आपला पहिला दिवस आहे.आज दसऱ्याचे सीमोल्लंघन आहे. या दिवशी रामाने रावणाचा नाश केला  होता. अन्यायाचे निर्दालन केले होते. त्यामळे आज महत्वाचा दिवस आहे. समाजात असलेल्या घटनाबाह्य, अन्याय कारक बाबींचे आपणास निर्दालन करावयाचे आहे.आपण सर्वांनी एकत्र कार्य करून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर महाराष्ट्रात नंबर एकाचा पक्ष बनवायचा आहे, असेही ते म्हणाले.  
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com