उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवणार - एकनाथ खडसे      

समाजातील अन्यायकारक व घटनाबाह्य गोष्टींचे निर्दालन करावयाचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी येथे केले. मुंबई येथे भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आज ते जळगावात दाखल झाले.
उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवणार - एकनाथ खडसे      
Ekanath Khadse

जळगाव : समाजातील अन्यायकारक व घटनाबाह्य गोष्टींचे निर्दालन करावयाचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ  खडसे यांनी येथे केले. मुंबई येथे भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आज ते जळगावात दाखल झाले.

जळगावात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.आज सकाळी दहा वाजता ते आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आले. त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचे स्वागत केले..या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील. महिला आघाडीच्या कल्पना पाटील, अजय बढे आदी उपस्थित होते. 

या वेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, ''राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा आज आपला पहिला दिवस आहे.आज दसऱ्याचे सीमोल्लंघन आहे. या दिवशी रामाने रावणाचा नाश केला  होता. अन्यायाचे निर्दालन केले होते. त्यामळे आज महत्वाचा दिवस आहे. समाजात असलेल्या घटनाबाह्य, अन्याय कारक बाबींचे आपणास निर्दालन करावयाचे आहे.आपण सर्वांनी एकत्र कार्य करून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर महाराष्ट्रात नंबर एकाचा पक्ष बनवायचा आहे,''

यावेळी त्यांच्या समवेत पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या अॅड. रोहिणी खडसे उपस्थित होत्या. तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in