नाशिकमधील कोरोना टेस्टिंग लॅब आठ दिवसांतच बंद!

नाशिक येथील संशोधन केंद्रातील कोरोना टेस्टिंग लॅब कालपासून बंद पडली. स्वॅब मशीन मध्ये लावण्यासाठी लागणारी प्लास्टिक प्लेट (वेल) संपल्याने टेस्टिंग कालपासून बंद झाले. ते पुन्हा केव्हा सुरु होणार याविषयी अनिश्‍चितता आहे.
Corona Testing Lab in Nashik Became Non Functional Within Eight Days
Corona Testing Lab in Nashik Became Non Functional Within Eight Days

नाशिक : विविध संस्थांच्या पाठपुराव्यातून नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्रातील कोरोना टेस्टिंग लॅब कालपासून बंद पडली. स्वॅब मशीन मध्ये लावण्यासाठी लागणारी प्लास्टिक प्लेट (वेल) संपल्याने टेस्टिंग कालपासून बंद झाले. ते पुन्हा केव्हा सुरु होणार याविषयी अनिश्‍चितता आहे. 

पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाहणी केली होती. त्यावेळी लॅबमुळे कोरोना वैद्यकीय उपाययोजनांना वेग येईल असे प्रशासन तर्फे स्पष्ट करण्यात आले होते. पण आठ दिवस लॅब बंद ठेवण्याची नामुष्की नाशिककरांवर आली आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला महाविद्यालयाने वेल उपलब्ध नसल्याने टेस्टिंग बंद ठेवण्यात आल्याची माहिती कळविण्यात आली आहे. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगमध्ये यातील तांत्रिक विषयावर चर्चा झाली होती. 

प्रशासनाकडून महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेली यंत्रणा अतिशय जुनी व कालबाह्य झालेल्या देण्यात आली होती. त्याविषयी जिल्हाधिकारी व संबंधीतांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांना विश्‍वासतही घेतले नव्हते असे बोलले जाते. त्यामुळे येथील एक स्वॅब टेस्टींगला सुरवात केल्यावर त्याला ड्राय होऊन घटक विलगीकरणास जास्त वेळ लागत होता. त्याची संबंधींतांना कल्पना देण्यात आली होती. 

कोरोना टेस्टिंग च्या खासगी प्रयोगशाळेचा आग्रह लोकप्रतिनिधी आणि काही अधिकाऱ्यांनी धरला होता. मात्र हा आग्रह फलद्रूप झाला नसल्याने लॅब ला बाहेरून अडथळे आणले जाताहेत का? असा प्रश्न नाशिककरांना भेडसावू लागला आहे. लॅबमधील टेस्टिंग बंद पडल्याची माहिती मिळताच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संपलेले साहित्य उपलब्ध करून देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. सध्या मालेगावसह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या नाशिक शहर तसेच लगतच्या परिसरातही रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रोज नवे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वॅब तपासणीसाठी येण्याची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत नमुणे तपासणीच्या कामाला गती देण्यासाठी ही लॅब कार्यरत होणे आवश्‍यक असल्याचे तज्ञांचे मत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com