धुळे तालुक्यात ९० टक्के ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व

तालुक्यामध्ये तब्बल ९० टक्के ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपलं वर्चस्व कायम ठेवले असून धुळे तालुक्यामध्ये आमदार कुणाल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु निकाला अंती धुळे तालुक्यामध्ये भाजपला दणका देत काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीने आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. काँग्रेसच्या विचारांनाच मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कौल दिला असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Jaykumar Rawal, Kunal Patil, Ambrish Patel
Jaykumar Rawal, Kunal Patil, Ambrish Patel

धुळे :  तालुक्यामध्ये तब्बल ९० टक्के ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपलं वर्चस्व कायम ठेवले असून धुळे तालुक्यामध्ये आमदार कुणाल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु निकाला अंती धुळे तालुक्यामध्ये भाजपला दणका देत काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीने आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. काँग्रेसच्या विचारांनाच मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कौल दिला असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपसह अन्य पक्षांनी आपल्या मतदारसंघात गड कायम राखले असून लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा केला. धुळे जिल्ह्यात २१८ ग्रामपंचायतींपैकी ३७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १८१ ग्रामपंचायतीसाठी ७७ टक्के मतदान झाले होते. 

ग्रामपंचायत निवडणुकीचा सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला, यावेळी शिंदखेडा तालुक्यात ६७ ग्रामपंचायतींपैकी ५६ ग्रामपंचायतींवर भाजपने सत्ता प्राप्त केली असून धुळे तालुक्यात ९० टक्के जागांवर काँग्रेसने यश प्राप्त केले आहे. तर शिरपूर तालुक्यात अमरीश पटेल यांनी आपला सिलसिला कायम ठेवत भाजपची एक हाती सत्ता मिळवली आहे.

शिरपूर तालुक्यामध्ये ३४ ग्रामपंचायतींपैकी सहा ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्यानंतर २८ ग्रामपंचायती साठी निवडणुका पार पडल्या या सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींवरती भाजप हे वर्चस्व राहिले असून शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर भाजपा म्हणजेच माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य अमरीश भाई पटेल यांचं वर्चस्व कायम राहिले आहे

दरम्यान, हुल्लडबाज कार्यकर्त्यांचा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना आपला खाक्या दाखवत हुल्लड बाजांना काठ्यांचा प्रसाद द्यावा लागला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे मतमोजणी पार पडत असताना धुळे शहरातील क्यूमाईन क्लब परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी आरडाओरड करत एकच गोंधळ केला.  पोलिसांनी या जमावाला पांगवण्यासाठी आपला खाक्या दाखवत काठीचा प्रसाद कार्यकर्त्यांना देत जमाव पांगवला
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com