त्या सहा जणांचा गौरव ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा समावेश आहे. सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार तर नामदेव कांबळे यांना साहित्याबद्दल, कला क्षेत्रातील परशुराम गंगावणे आणि उद्योग श्रेत्रासाठी जसवंतीबेन पोपट यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा समावेश आहे. सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार तर नामदेव कांबळे यांना साहित्याबद्दल, कला क्षेत्रातील परशुराम गंगावणे आणि उद्योग श्रेत्रासाठी जसवंतीबेन पोपट  यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्रातील उद्योजक रजनीकांत देविदास श्रॉफ यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सहा जणांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अभिनंदन केले. 

या सर्व मान्यवरांचे अभिनंदन करतानाच भुजबळ यांनी या सहा जणांचा गौरव म्हणजे महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना देखील व्यक्त केली. महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, उद्योग आणि कला विश्वाचा हा गौरव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी ते म्हणाले की पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले लोककलावंत परशुराम गंगावणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कळसुत्री बाहुल्यांच्या खेळातून जनजागृती, लोकप्रबोधन करत असतात संपूर्ण महाराष्ट्राला अनाथांची माय असलेल्या सिंधुताईं आपल्या सर्वांना परिचित आहेत, साहित्यिक नामदेव कांबळे यांच्यासारख्या ध्येयवेड्या व्यक्तिमत्वांचा पद्मपुरस्काराने झालेला सन्मान हा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.याचबरोबर फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरातील पद्म पुरस्कारांनी सन्मानीत झालेल्यांचे देखील त्यांनी अभिनंदन केले.
....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com