मोदींच्या गुजरात भाजपची धुरा खानदेशातील सुपुत्राच्या हाती 

खानदेशातील जळगाव जिह्याचे सुपुत्र खासदार सी. आर. पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या गुजरात प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एका मराठी माणसाकडे गुजरात राज्याच्या सत्तेवरील पक्षाची धुरा देण्यात आली आहे.
Chandrakant Patil elected as Gujarat BJP state president :
Chandrakant Patil elected as Gujarat BJP state president :

जळगाव : खानदेशातील जळगाव जिह्याचे सुपुत्र खासदार सी. आर. पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या गुजरात प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एका मराठी माणसाकडे गुजरात राज्याच्या सत्तेवरील पक्षाची धुरा देण्यात आली आहे. 

खासदार सी. आर. पाटील हे खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकाराऊत येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म पिंप्री अकारूत येथेच झाला. त्यांचे शिक्षण आय. टी. आय. पर्यंत झाले आहे. गुजरात राज्यातील सूरत येथे सन १९८९ मध्ये पोलिस कॉन्स्टेबलपदी भरती झाले होते. त्यानंतर सूरत या ठिकाणी कार्य करीत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी नवसारी महापालिकेचे महापौरपदही भूषविले आहे.

त्यानंतर नवसारी विधानसभा मतदार संघातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. या मतदार संघातून सलग तीन टर्म ते विजयी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल ६ लाख ८९ हजारांपेक्षा अधिक मतानी पराभव केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सी. आर. पाटील हे अत्यंत विश्‍वासू मानले जातात. त्यांनी आपल्या नवसारी मतदार संघात तंत्रज्ञान वापरून अत्यंत चांगला विकास केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आपल्या वाराणसी मतदार संघाच्या विकासाचे को-ऑर्डिनेटर नियुक्त केले आहे. नवसारी मतदार संघातील त्यांच्या कार्यालयास आयएसओ ९००१-२००५ प्रमाणपत्र मिळाले आहे. असे प्रमाणपत्र मिळविणारे ते देशातील पहिलेच खासदार ठरले आहेत. 

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे देण्यात आली आहे. राष्ट्रीय महासचिव मुख्यालय प्रभारी अरुण सिंग यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले आहे. गुजरात राज्याच्या एका प्रमुख पक्षाच्या अध्यक्षपदी प्रथमच मराठी व्यक्तीची नियुक्ती झाली आहे. सी. आर. पाटील यांचे आजही खानदेशच्या जळगाव जिल्ह्याशी नाते कायम आहे. जळगाव येथे आदर्श नगर येथे त्यांचे निवासस्थान आहे. अधूनमधून ते जळगाव जिल्हयात येत असतात. त्यांच्या या नियुक्तीमुळे खानदेशच्या मुकुटात एक अभिमानाचा तुरा रोवला आहे. 


कॉंग्रेसच्या मंत्र्यांचे चालत नाही, अशा सरकारमधून बाहेर पडा 

आळंदी (जि. पुणे) :आधी नोटबंदी आणि आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील जनता आर्थिक संकटात आहे. अशावेळी शिक्षण सम्राटांकडून आजही शालेय शिक्षणाच्या शुल्कासाठी विद्यार्थ्यांकडे तगादा लावला जात आहे. शालेय शुल्क आणि वाढीव वीजबिलांपासून नागरिकांना दिलासा मिळावा; म्हणून पत्रव्यवहार करूनही राज्यातील कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडून अद्याप न्याय दिला जात नसल्याची तक्रार आळंदीतील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी केली आहे. 

आळंदीतील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना पत्रव्यवहार करून राज्यातील कॉंग्रेसच्या मंत्र्यांना सदबुद्धी देण्याबाबतची विनंती केली आहे. एवढ्यावरच न थांबता शालेय शुल्क आणि वीज बीलाबाबत दिलासादायक भूमिका न घेतल्यास कॉंग्रेस मंत्र्यांच्या विरोधात आळंदीत लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशाराही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com