'चंपा'.... नो कॉमेंटस : गिरीश महाजन 

माजी आमदार अनिल गोटे यांना काहीही बोलण्याची मुभा आहे, त्यामुळे आपण त्यांच्याबाबत कोणतेही वक्तव्य करणार नाही. "नो कॉमेंटस' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार गिरीश महाजन यांनी गोटे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला.
'Champa' .... No Comments: Girish Mahajan
'Champa' .... No Comments: Girish Mahajan

जळगाव : माजी आमदार अनिल गोटे यांना काहीही बोलण्याची मुभा आहे, त्यामुळे आपण त्यांच्याबाबत कोणतेही वक्तव्य करणार नाही. "नो कॉमेंटस'. अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार गिरीश महाजन यांनी गोटे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे "चंपा' हे नाव गिरीश महाजन यांनी ठेवले आहे. देवेंद्र फडणवीस यांना "टरबुज्या' भारतीय जनता पक्षातील फडणवीस यांच्या विरोधी गटातील लोक म्हणतात. गिरीश महाजन यांनी आपल्यासमोर "अरे लाव रे चंपाला फोन' असे सांगितले असल्याचेही गोटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

अनिल गोटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांना त्यांनी टोले लगावल्यामुळे भाजपचे नेते यावर काय बोलतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

अनिल गोटे यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत भाजपचे नेते व माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, अनिल गोटे यांना काहीही बोलण्याची मुभा आहे, ते कोणतेही वक्तव्य करू शकतात. ते काहीही बोलू शकतात. त्यांना बोलण्याचे सर्व स्वातंत्र्य आहे. धुळेकरांना हे चांगले माहीत आहे. त्यांचे वक्तव्य फारसे कोणीही गांभीर्याने घेतही नाही, त्यामुळे त्यांनी काहीही बोलले तरी आपण कोणतेही वक्तव्य करणार नाही. गोटे यांच्या वक्तव्याबाबत आपले "नो कॉमेंटस' आहे. 

गिरीश महाजनांनी 'चंपा' फेमस केलं...

जळगाव : चंद्रकांत पाटील यांच्या "चंपा'' नावाचे बारसे गिरीश महाजन यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांना "टरबुज्या' भाजपमधीलच त्यांच्या विरोधी गटाचे लोक म्हणायचे. तेच नामकरण सर्वश्रृत झाले आहे. त्याला विरोधी पक्ष काय करणार ? असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे.

भाजपचे आमदार गोपीनाथ पडळकर यांनी अपशब्द वापरल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे भाजपवर जोरदार हल्ला चढविला होता.  


त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उत्तर दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते कि, विरोधी पक्षातील लोक मला "चंपा', फडणवीसांना "टरबुज्या' म्हणतात. त्यावर विरोधी नेते का बोलत नाही? 

यावर उत्तर देतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कि चंद्रकांत पाटील यांना "चंपा' म्हणल्याचे तीव्र दु:ख होत आहे. मात्र त्यांना हे माहित नसावे, कि त्यांचे "चंपा' नावाचे बारसे स्वत: गिरीश महाजन यांनीच केले आहे, महाजनांच्या कार्यालयात बसलो असतांना "अरे त्या 'चंपा'ला फोन लाव ! असे त्यांनी सांगितले. 

भाजपमधील नेत्यांचे बारसे अन्य कुणी करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही, आपआपसातील व्देश आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती कि, त्यांनीच एकमेकांचे नामकरण करून गुपचुप बारसे साजरे केले. देवेंद्र फडणवीसांच्या विरोधी गटात असलेले अनेक नेते फडणवीसांना "टरबुज्या'म्हणायचे! आता तर तेच नामकरण सर्वश्रृत झाले. त्याला विरोधी पक्ष करणार तरी काय ? तसेही भाजपमध्ये स्वत:चे नाव आणि आडनाव एकत्र करून उल्लेख करण्याची पध्दत आहेच.

 नरेंद्र मोदीना "नमो' म्हणतात. अमित शहाना "मोटाभाई' म्हणतात. चंद्रकांत पाटील यांना "चंपा' म्हणत असावेत असे माझे भोळे भाबडे विचार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com