खडसेंचा हात लागलेले प्रकल्प गेल्या पाच वर्षात रोखले - BJP Stopped Projects inaugurated By Ekanath Khadse Claims Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

खडसेंचा हात लागलेले प्रकल्प गेल्या पाच वर्षात रोखले

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

ज्या प्रकल्पाचे एकनाथ खडसे यांनी उद्घाटन केले त्या प्रकल्पाकडे  गेल्या पाच वर्षात हेतुपुरससर दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे जलसपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

जळगाव : ज्या प्रकल्पाचे एकनाथ खडसे यांनी उद्घाटन केले त्या प्रकल्पाकडे  गेल्या पाच वर्षात हेतुपुरससर दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे जलसपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

राष्ट्रवादी परिवार  परिसंवाद या अंतर्गत ते आज अमळनेर तालुक्यात आहेत. या ठिकाणी त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पडलसरे धरणाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, जिल्हा अधक्ष अॅड.रवींद्र पाटील आदी. उपस्थित होते .या वेळी त्यांनी धरणाच्या रखडलेल्या कामाची माहिती  घेतली अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

यावेळी बोलताना ते म्हणाले, ''गेल्या पाच वर्षात या धरणाचे  कोणतेहि काम. झाले नाही. याचीही जनतेने नोंद घ्यावी. एकनाथ खडसे यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. त्यामुळे ते भाजपने हेतुपुरस्सर रखडवले.नमात्र आता आपले सरकार आले आहे.नया धरणासाठी निधी उलब्ध करून अडीच वर्षात धरणाचे काम पूर्ण करून ज्यांच्या हस्ते शुभारंभ झाला त्यांच्याच हस्ते पूर्णत्वाचे उद्घाटन करण्यात येईल व धरणात पाणीसाठा साठा करून शेतकऱ्यांना पाणी देण्यात येईल.''
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख