भाजप प्रदेश कार्यकारिणीत खानदेशातून आठ जणांचा समावेश 

भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकरिणी आज (ता. 3 जुलै) जाहीर करण्यात आली, यात खानदेशातील आठ जणांचा सामवेश करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील जयकुमार रावल यांची प्रदेश उपाध्यक्ष, तर रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
BJP state executive includes eight people from Khandesh
BJP state executive includes eight people from Khandesh

जळगाव : भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकरिणी आज (ता. 3 जुलै) जाहीर करण्यात आली, यात खानदेशातील आठ जणांचा सामवेश करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील जयकुमार रावल यांची प्रदेश उपाध्यक्ष, तर रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज घोषित केली आहे. खानदेशातील आठ जणांचा त्यामध्ये समावेश आहे. राज्याचे माजी पर्यटन मंत्री व धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील आमदार जयकुमार रावल यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघातील खासदार रक्षा खडसे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रदेश समिती सदस्यामध्ये श्रीमती माधुरी बोरसे (धुळे), श्रीमती जयश्री अहिरराव (धुळे), बबन चौधरी (धुळे) माजी आमदार स्मिता वाघ (जळगाव), राजेंद्र गावित (नंदुरबार) अशोक कांडेलकर (जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

कायम विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे,(जळगाव) गिरीश महाजन (आमदार जामनेर), खासदार डॉ. सुभाष भामरे (धुळे) डॉ. विजयकुमार गावित (आमदार, नंदुरबार) या खानदेशातील नेत्यांचा समावेश आहे. 

नाही, नाही म्हणत विजयदादा भाजपचे विशेष निमंत्रित सदस्य बनले 

पुणे : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माढ्याचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे नाही, नाही म्हणत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य बनले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (ता. 3 जुलै) जाहीर केलेल्या कार्यकारिणी समितीमध्ये मोहिते पाटील यांना हे पद देण्यात आले आहे. त्यामुळे विजयदादा आता भाजपचे अधिकृत सदस्य बनले आहेत. 

मोहिते पाटील यांना यापूर्वी भाजप प्रवेशाबाबत विचारले असता त्यांचे उत्तर ठरलेले असायचे, मी कोठेही गेलो नाही. मी अधिकृतरित्या भाजपमध्ये गेलेलो नाही. मी अजूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सदस्य आहे, असे ते सांगायचे. भाजपने आज प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात विशेष निमंत्रितांच्या यादीत विजयदादा यांच्या नावाचा समावेश आहे. 

विजयसिंह मोहिते-पाटील यांनी अधिकृत भाजप प्रवेश केल्याचे याआधी नाकारले असले तरी त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मात्र मुंबईत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकलूज येथे झालेल्या सभेत रणजितसिंह यांच्यासह विजयदादा व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानंतरही विजयदादा आपण भाजपचे सदस्य नसल्याचे सांगत होते. 

काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे झालेल्या कार्यक्रमात विजयदादा उपस्थित होते. तेव्हाही त्यांनी माध्यमाशी बोलताना आपण कोठेही गेलो नाही. आमचा मुलगा भाजपमध्ये गेला आहे. मी अजूनही राष्ट्रवादी सोडली नसल्याचे त्यांनी सांगितले होते. 

या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांना येण्यास थोडास वेळ होता. त्या वेळी दूरवर बसलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना शरद पवार यांनी जवळ बोलावून घेतले. त्यांच्याशी पवार यांनी बराच वेळ चर्चाही केली होती. त्या कार्यक्रमानंतर त्यांनी आपण यापूर्वीही शरद पवार यांना दोन ते तीन वेळा भेटल्याचे सांगितले होते. राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर विजयदादा हे पुन्हा राष्ट्रवादीशी जुळून घेणार की काय? अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली होती. 

दुसरीकडे हक्काच्या माढा मतदारसंघातून भाजपने साताऱ्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेचे तिकिट दिले होते. त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांना राज्याच्या मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता. परंतु रणजितसिंह यांना संधी मिळाली नव्हती. त्याच वेळी गोव्याच्या राज्यपालपदी विजयसिंह मोहिते पाटील यांची नेमणूक होणार, अशीही चर्चा रंगली होती. परंतु त्याही पदाने मोहिते पाटील यांना हुलकावणी दिली होती, त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये काहीशी नाराजीची भावना होती. 

काही दिवसांपूर्वी रणजितसिंह यांची विधान परिषदेवर भाजपने निवड केली आहे. त्यानंतर आता तर खुद्द विजयदादा यांना भाजपने विशेष निमंत्रित कार्यकारी सदस्य बनविले आहे, त्यामुळे आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडली, असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर यापुढे येणार नाही. 

दरम्यान, पुणे जिल्ह्यातून इंदापूरचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, नगरमधून वैभव पिचड यांनाही प्रदेश कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित म्हणून नेमले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com