भाजपने वाढविला महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ

माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्‌घाटन झाले. आगामी महापालिका निवडणूक भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचे सांगताना महाजन यांनी मागच्या पेक्षा अधिक जागा निवडून येतील, असा दावा केला.
BJP Started Campaing for Nashik Municipal Corporation Elections
BJP Started Campaing for Nashik Municipal Corporation Elections

नाशिक : पुढील वर्षाच्या प्रारंभीच होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने शनिवारी विविध विकासकामांच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ वाढविला आहे.

माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्‌घाटन झाले. आगामी महापालिका निवडणूक भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचे सांगताना महाजन यांनी मागच्या पेक्षा अधिक जागा निवडून येतील, असा दावा केला.

शहरातील सहा विभागांमध्ये रस्ते खडीकरण, डांबरीकरण व काँक्रिटीकरण कामाचे उद्‌घाटन झाले. पहिल्या टप्प्यात शंभर कोटी, दुसऱ्या टप्पात २०० कोटी, तर तिसऱ्या टप्प्यात २५० कोटी रुपये, असे एकूण ५५० कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे झाल्याचा दावा करण्यात आला. शहरात ९० हजार स्मार्ट एलईडी दिवे बसविण्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. नवीन वीस हजार विद्युत पोल, १२० किलोमीटरच्या मलवाहिका, पंचवटी विभागात नाट्यगृहाची निर्मिती, दिव्यांगांसाठी उपचार व प्रशिक्षण केंद्राच्या कामाचे उद्‌घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी शहरातील १७ जलकुंभांचे लोकार्पण श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

पूर्व प्रभागअंतर्गत येणाऱ्या विविध रस्त्यांच्या ३१ कोटींच्या विविध रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ इंदिरानगरमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभाग २३, ३० आणि ३१ साठीचा एकत्रित कार्यक्रम रथचक्र चौकात झाला. प्रभाग ३० च्या नगरसेविका सुप्रिया खोडे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला. गतवेळी गेलेल्या दोन जागांसह संपूर्ण १२ जागा निवडून देऊ, असा शब्द उपस्थित नगरसेवकांच्या वतीने सभागृहनेते सतीश सोनवणे यांनी माजी पालकमंत्र्यांना दिला.

यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, नगरसेवक चंद्रकांत खोडे, शाहीन मिर्झा, रूपाली निकुळे, ॲड. श्‍याम बडोदे, डॉ. दीपाली कुलकर्णी, भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड, ॲड. अजिंक्य साने, माजी नगरसेवक यशवंत निकुळे, संजय नवले, एकनाथ नवले, राम बडगुजर, ॲड. भानुदास शौचे, वैभव कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, साहेबराव आव्हाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com