कै. निखिल खडसेंचा फोटो भाजपने हटवला?

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांचे दिवंगत पूत्र निखिल खडसे यांचे छायाचित्र भाजप कार्यालयातून हटवल्याने खडसे समर्थक व भाजपचे स्थानिक नेते यांच्यात वाद सुरु झाला आहे.कै. निखिल हे भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे पती होते.
BJP Removed Nikhil Khadse Photo from Jalgaon Office Allege Ekanath Khadse Supporters
BJP Removed Nikhil Khadse Photo from Jalgaon Office Allege Ekanath Khadse Supporters

जळगाव : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांचे दिवंगत पूत्र निखिल खडसे यांचे छायाचित्र भाजप कार्यालयातून हटवल्याने खडसे समर्थक व भाजपचे स्थानिक नेते यांच्यात वाद सुरु झाला आहे. कै. निखिल हे भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे पती होते. 

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर आरोप करत खडसेंनी भाजप सोडला. खडसेंचे जळगाव, नंदूरबार जिल्ह्यात मोठे वर्चस्व आहे. त्यांच्या पाठोपाठ या दोन जिल्ह्यांतील अनेक नेते राष्ट्रवादीत जातील असे बोलले जाते. खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर त्यांचे समर्थक व भाजपचे कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमकी घडू लागल्या आहेत. 

त्यातच जळगावच्या भाजप कार्यालयात लावण्यात आलेले एकनाथ खडसे व कै. निखिल खडसे यांची छायाचित्रे स्थानिक नेत्यांनी हलविल्याचा आरोप नाथ फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी, सुनिलभैय्या माळी, रविंद्र पाटिल, डॉ.अभिषेक ठाकुर व नाथ फाऊंडेशन जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  "नाथाभाऊंनी पक्ष सोडल्यावर भाजपाची विचारधारा एवढी खालावेल असे वाटले नव्हते. लेवा पाटिदार समाजाचे नेते असलेल्या नाथाभाऊंचा गेली ४ वर्ष छळ करण्यात आला. आज लेवा समाजाचे दिवंगत युवानेते निखिलदादांचा देखील द्वेष केला जात आहे. वास्तविक दिवंगत व्यक्तीबाबत द्वेष करणारी ही पहिलीच घटना असेल. यावरुनच त्यांच्या कुत्सित विचारांचे प्रदर्शन होते.'' असे फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

या बाबत भाजपचे महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी निखील खडसे यांचा फोटो काढला नसल्याचे सांगितले. 

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com