यशोमती म्हणल्या, भाजप शेणातला कीडा, मग भाजपच्या चाैधरींनीही केला असा पलटवार

केंद्रात सत्ता मिळाली असताना भाजपला राज्यातील सत्तेची हाव आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार स्थिर आहे. या सरकारने देशासमोर नवा फॉर्म्यूला ठेवला असून, तो दीर्घकाळ टिकेल. कोणी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही चांगलेच बदडू.
Yashomati Thakur - Nivedita Chaudhari
Yashomati Thakur - Nivedita Chaudhari

अमरावती : राजस्थानमधीलकॉंग्रेसचे सरकार पाडण्याच्या प्रयत्नात सपाडून मार खालल्यानंतर भारतीय जनता पक्षाची वाईट नजर महाराष्ट्राकडे वळली आहे. पण येथे त्यांची डाळ शिजणार नाही. भाजपचे नेते व कार्यकर्त्यांनी राजस्थाननंतर महाराष्ट्र, अशा सुरू केलेल्या कथित प्रचारावरून राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री ऍड. यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या आहेत. भाजपला त्यांनी सत्तेसाठी वळवळणारा शेणातला कीडा असे संबोधले आहे. त्यावर पलटवार करीत भाजपनेही कॉंग्रेसमधील असंतुष्टच बाहेर पडत असल्याने यशोमती ठाकूर यांनी आपला पक्ष सांभाळावा, असा सल्ला दिला आहे. 

महाराष्ट्रातही कॉंग्रेसमध्ये लवकरच फूट पडणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार आहे, असा प्रचार सोशल मीडियावरून सुरू झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना यशोमती ठाकूर यांनी भाजपला शेणातला कीडा, असे संबोधून महाराष्ट्रात भाजप असे फोडाफाडीचे राजकारण करणार असेल तर गाठ माझ्याशी आहे. कॉंग्रेसशी आहे, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला. 

केंद्रात सत्ता मिळाली असताना भाजपला राज्यातील सत्तेची हाव आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार स्थिर आहे. या सरकारने देशासमोर नवा फॉर्म्यूला ठेवला असून, तो दीर्घकाळ टिकेल. कोणी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही चांगलेच बदडू. आम्ही गांधीवादी आहेत. पण, भाजपची दादागिरी किती दिवस सहन करायची, असा सवालही यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. 

कॉंग्रेसच नेतृत्वहीन 
यशोमती ठाकूर यांच्या या इशाऱ्याला भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी उत्तर देत यशोमती ठाकूर यांचा इशारा सवंग प्रसिद्धीसाठी असल्याचे म्हटले आहे. भाजप कॉंग्रेसचे आमदार फोडत नाही. स्वतः कॉंग्रेसच नेतृत्वहीन झाल्याने व कॉंग्रेसमध्ये भविष्य दिसत नसल्याने विविध राज्यांतील कॉंग्रेसचे आमदार भाजपमध्ये दाखल होत आहेत. महाराष्ट्रातही असे काही होऊ शकते, याची कदाचित चाहूल यशोमती ठाकूर यांना लागली असावी, असे त्या म्हणाल्या. 

सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशा क्‍लूप्त्या 
सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशा क्‍लूप्त्या अधून मधून लढविणे ही यशोमती ठाकूर यांची जुनीच सवय आहे. मंत्री राज्याच्या असताना त्या राज्यात फिरून लोकांचे प्रश्‍न सोडविण्याऐवजी अमरावतीत बसून नुसत्या उठाठेवी करीत आहेत. अशी टीका सुद्धा निवेदिता चौधरी यांनी केली. या प्रतिक्रियांमुळे राजकीय क्षेत्रातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.    (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com