अमराठी दुष्यंत यांना निष्ठावंत शिवसैनिक स्वीकारतील का? 

विदर्भाचे संपर्कप्रमुख गजानन किर्तीकर यांनी जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांना वाचवण्याचा पवित्रा घेतला होता. त्यावरुन त्यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी घेतला होता. त्यांनी संपूर्ण जोर लावूनसुद्धा जाधवांना ते वाचवू शकले नाही. अमराठी नेत्याची संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करून त्यामुळे श्रेष्ठींकडून किर्तीकरांचे पंख तर छाटले जात नाहीयेत ना?
Dushyant Chaturvedi
Dushyant Chaturvedi

नागपूर- सहा महिन्यांपूर्वी शिवसेना प्रवेश, त्यानंतर आमदार, आता नागपूर महानगर संपर्क प्रमुख अशी झपाट्याने झेप घेणाऱ्या अमराठी दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाला निष्ठावंत शिवसैनिक स्वीकारीतील का? असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. हे सारे धोके ओळखूनच पक्षश्रेष्ठींनी जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक असताना त्यांना "संपर्का'वरच सिमित ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

शहर प्रमुख मंगशे कडवचे खंडणी प्रकरण शिवसेनेने चांगलेच मनावर घेतले. त्याची तडकाफडकी हकालपट्टी केली. त्यांचे समर्थक समजले जाणारे जिल्हा प्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव यांचेही अधिकार गोठावले. हे सर्व प्रकार कोणाच्या तरी इशाऱ्यावरून घडत असल्याची चर्चा सुरू झाली. विरोधकांचा रोख चतुर्वेदी यांच्याकडे होता. पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख यांनीही काही अमराठी नेते कुरघोडी करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे वक्तव्य करून यास खतपाणी घातले. अर्थातच प्रकाश जाधव यांच्या बचावासाठी. त्यानंतर या वादाला आणखी धार चढली.

पक्षाची कार्यकारीणी नेमताना संपर्कप्रमुखांना कोण मराठी, कोण अमराठी हे कळले नाही काय, असेही आरोप पक्षांतर्गत विरोधकांनी किर्तीकरांवर केले. त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला आणि प्रकरण वेगळे वळण घेऊ लागले. त्यानंतर काय झाले कुणास ठाऊक, सर्वांनीच मौन बाळगले. सेनापतीविना शिवसैनिक काम करू लागले. दरम्यान तडकाफडकी अमराठी नेते दुष्यंत चतुर्वेदींना नागपूर शहराचे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यामुळे अमराठी नेत्यांचा विजय झाला, असे मानन्यात येत आहे. मात्र जिल्हा प्रमुख पद रिक्तच ठेवण्यात आले. मराठी-अमराठी वाद उफाळून येऊ नये म्हणून दुष्यंत यांना एक पाऊल मागे घेण्यास सांगितले. कालांतराने वाद क्षमल्यावर जिल्हाप्रमुख पदी त्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

किर्तीकरांचे पंख छाटले ? 

शिवसेनेत संपर्क प्रमुख मोठे पद मानल्या जाते. मुंबईत संपर्क प्रमुखाच्या अहवालावर सारा खेळ उवलंबून असते. विदर्भाचे संपर्कप्रमुख गजानन किर्तीकर यांनी जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांना वाचवण्याचा पवित्रा घेतला होता. त्यावरुन त्यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी घेतला होता. त्यांनी संपूर्ण जोर लावूनसुद्धा जाधवांना ते वाचवू शकले नाही. अमराठी नेत्याची संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करून त्यामुळे श्रेष्ठींकडून किर्तीकरांचे पंख तर छाटले जात नाहीयेत ना, अशीही चर्चा पक्षाच्या अंतर्गत गोटातून ऐकायला आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com