‘जय श्रीराम' म्हणण्यासाठी परवानगी लागेल काय?

वैष्णव देवी चौकात लाऊडस्पिकर लावण्यास पोलिस निरीक्षकांनी मनाई केली. रांगोळीसुद्धा काढू दिली नाही. या कारवाईचा भाजपच्या सर्व आमदारांनी निषेध नोंदवला. अशी हुकूमशाही फक्त हिंदू समाजावर केली जात असून इतर धर्मीयांना मुभा दिली जात असल्याचा आरोप दटके यांनी केला.
Pravin Datke
Pravin Datke

नागपूर : अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन सुरू असताना नागपुरातही त्याचा जल्लोष सुरू होता. ठिकठिकाणी रांगोळ्या, भगवे झेंडे आणि पताका लावल्या जात होत्या. पण हे करीत असताना रामभक्तांवर पोलीसांनी कारवाई केली. त्यामुळे आता हिंदूंना जय श्रीराम म्हणण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल, काय असा सवाल भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी केला.

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचे स्वागत करणाऱ्या रामभक्तांवर पोलिसांनी केलेली कारवाई आणि त्यात निर्माण केलेल्या अडथळ्यांचा भाजपच्यावतीने निषेध नोंदवण्यात आला. सुमारे तीन दशकांपासून रामभक्त करीत असलेल्या राम मंदिर निर्माणासाठी सुरू असलेल्या संघर्षाची स्वप्नपूर्ती होऊ लागली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बुधवारी मंदिर उभारणीची पायाभरणी करण्यात आली. याचा आनंद साजरा करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे, पताका लावल्या जात होत्या. मात्र पोलिसांनी रामभक्तांना अडविले. नागपूर नागरिक सहकारी बँकेच्यावतीने हेडगेवार चौकात सजावट करण्यास बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांना रोखण्यात आले. वजीन शेख नावाच्या पोलिस निरीक्षकाने भगवे झेंडे लाऊ दिले नाही.

वैष्णव देवी चौकात लाऊडस्पिकर लावण्यास पोलिस निरीक्षकांनी मनाई केली. रांगोळीसुद्धा काढू दिली नाही. या कारवाईचा भाजपच्या सर्व आमदारांनी निषेध नोंदवला. अशी हुकूमशाही फक्त हिंदू समाजावर केली जात असून इतर धर्मीयांना मुभा दिली जात असल्याचा आरोप दटके यांनी केला. यावेळी आमदार अनिल सोले, गिरीश व्यास, विकास कुंभारे, मोहन मते, कृष्णा खोपडे, नागोराव गाणार तसेच संदीप जाधव, अरविंद गजभिये, चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.    (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com