वडेट्टीवार म्हणाले, ‘तो’ आजोबांचा अधिकार...!

महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये काहीतरी चुकीचा संदेश गेला पाहिजे आणि आपली राजकीय पोळी शेकता आली पाहिजे. यासाठीच आता विरोधकांचे हातपाय आपटणे सुरू आहे. त्यांनी कितीही ओरड, आदळआपट केली, काव-काव केली, तरीही महाविकास आघाडीच्या सरकारला धोका नाही.
Parth Pawar-Wadettiwar-Sharad Pawar.
Parth Pawar-Wadettiwar-Sharad Pawar.

नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ चर्चेत आहेत. कारण राम मंदिराच्या भूमिपूजनाला त्यांनी पाठिंबा दिला होता आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यानंतर राज्यभर विविध चर्चांना उधाण आले होते. आज बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना या विषयाबाबत विचारले असता, पार्थ पवार यांना फटकारणे, हा एका आजोबांचा अधिकार आहे, असे ते म्हणाले. 

घरातील एक मुलगा किंवा नातू चूक करीत असेल, तर कुटुंबप्रमुख या नात्याने त्याला रागावण्याचा आजोबांचा अधिकार आहे. कुटुंबप्रमुखांनी फटकारल्यावर मुलांनी स्वतःमध्ये सुधारणा करून घेणे, ही आपली संस्कृती आहे. पार्थ पवारही तेच करतील, असा विश्‍वास आहे. या विषयाला आता आणखी ओढण्यात करण्यात काहीही अर्थ नाही. सत्ता मिळविण्यासाठी कोणतेही विषय उभे करायचे आणि राज्यात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे, असेही मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये काहीतरी चुकीचा संदेश गेला पाहिजे आणि आपली राजकीय पोळी शेकता आली पाहिजे.  यासाठीच आता विरोधकांचे हातपाय आपटणे सुरू आहे. त्यांनी कितीही ओरड, आदळआपट केली, काव-काव केली, तरीही महाविकास आघाडीच्या सरकारला धोका नाही. ते मुहूर्त काढत जातील, पण सरकार इंचभरही हलणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.   

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धोरणाच्या विरोधात जाऊन पार्थ पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या होत्या. हे कमी झाले की काय म्हणून त्यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयला देण्याचीही मागणी केली होती. त्यानंतरही काही काळ शरद पवार यांनी याबाबत काहीही वक्तव्य केले नव्हते. बुधवारी त्यांनी ‘पार्थ अपरिपक्व आहेत, त्यांच्या मताला मी कवडीचीही किंमत देत नाही’, असे वक्तव्य माध्यमांसमोर केले होते. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते. काल सायंकाळी पार्थ यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी त्याची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com