आजचा वाढदिवस : देवेंद्र फडणवीस  - today's birthday devendra fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : देवेंद्र फडणवीस 

अतुल मेहेरे
बुधवार, 22 जुलै 2020

तरुण वयात मुख्यमंत्री झाल्याबद्दल शरद पवार यांचा आजही गौरव केला जातो. पवार यांच्यानंतर फडणवीस हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. आजही विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी ते समर्थपणे पेलत आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपुरात झाला. ते महाराष्ट्राचे २८ वे मुख्यमंत्री होते. नागपुरच्या दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करतात. ९०च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परीषद आणि भारतीय जनता युवा मोर्चातून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. फारच थोड्या कालावधीत जनसामान्यांतील युवा नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले. नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या पदवीचे शिक्षण विशेष गुणवत्तेसह पूर्ण केले. त्यानंतर व्यवस्थापनशास्त्राची पदवी मिळविली. 

शहराच्या धरमपेठ परीसरात त्यांचे निवासस्थान आहे. वयाच्या २५ व्या वर्षी पहील्याच प्रयत्नात ते नागपुरचे महापौर झाले. सर्वात तरुण महापौर म्हणून तेव्हा त्यांचा गौरव झाला. विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत कॉंग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करुन ते आमदार झाले. तेव्हा दक्षिण-पश्‍चिम हा केवळ पश्‍चिम नागपूर मतदारसंघ होता. दोन वेळा त्यांनी उत्कृष्ठ संसदपटुचा पुरस्कार पटकावला आहे. भारतीय जनता पक्षाचे ते तरुण प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले. तरुणपणी मुख्यमंत्री झाल्याबद्दल शरद पवार यांचा आजही गौरव केला जातो. पवार यांच्यानंतर फडणवीस हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. आजही विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी ते समर्थपणे पेलत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी विरोधकांसोबतच पक्षांतर्गत विरोधकांवरही जोरदार प्रहार केले आणि भारतीय जनता पक्षाला राज्यात घवघवीत यश मिळवून दिले. अशा या उमद्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! 

कारकीर्द :- 
– १९९९ ते आजतागायत – विधानसभा सदस्य 
– १९९२ ते २००१ सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोनवेळा नागपूरचे महापौर 
– २०१३ साली अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश 
– २०१० सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश 
– २००१ राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा 
– १९९४ प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा 
– १९९२ अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा 
– १९९० पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम 
– १९८९ वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख