युवतीच्या गुप्तांगाचा घेतला स्वॅब, संतप्त जमावाची मोदी हॉस्पीटलमध्ये तोडफोड 

सायंकाळपर्यंत याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाच्यावतीने तक्रार दाखल झाली नव्हती. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही, असे पोलिस निरीक्षक वंजारी यांनी स्पष्ट केले. रुग्णालयात शिवसेनेसह एआयएमआयएमचे सुमारे शंभर पदाधिकारी जमून त्यांनी घृणास्पद कृत्य करणाऱ्या लॅब कर्मचाऱ्याविरुद्ध घोषणाबाजी केल्याने वातावरण तापले होते.
amr30p_amravati
amr30p_amravati

अमरावती : शहरालगतच्या मोदी हॉस्पीटलमधील स्वॅब सेंटरमध्ये कोरोना चाचणीच्या नावाखाली टेक्निशिअनने युवतीचा गुप्तांगाचा स्वॅब घेतला. हा चिड आणणारा प्रकार काल घडला. युवतीने आपल्या भावाला सांगितल्यानंतर ‘त्या‘ टेक्नीशिअनची पोलीसांत तक्रार करण्यात आली. या घृणास्पद प्रकाराचे संतप्त पडसाद आज उमटले. शिवसेना व एआयएमआयएमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी हॉस्पिटलच्या स्वॅब सेंटरमध्ये तोडफोड केली. 

अचानक घडलेल्या या घटनेने स्वॅब सेंटरसह इतर कक्षांत उपस्थित डॉक्‍टर, परिचारिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खुर्च्या उचलून काचांवर फेकल्याने काही ठिकाणी काचा फुटल्या, असे पोलिस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी सांगितले. शहरातील एका मॉलमध्ये कार्यरत कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने त्याठिकाणी कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात येत होते. त्यासाठी संबंधित युवतीसुद्धा मोदी रुग्णालयात गेली होती. मात्र, तेथील लॅब टेक्‍निशियनने युवतीच्या गुप्तांगाचे स्वॅब घेतल्याने युवतीला संशय आला व तिने या घटनेची तक्रार बडनेरा पोलिस ठाण्यात केली. त्यावरून पोलिसांनी संबंधित लॅब टेक्‍निशियन विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

अशा पद्धतीने कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यावर तातडीने गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी जिल्ह्यात जोर धरत आहे. त्याचे संतप्त पडसाद आज उमटले. काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी रुग्णालय गाठून त्याठिकाणी तोडफोड करीत संबंधित गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनास्थळी बडनेऱ्यासह मुख्यालयाचे पथक तैनात करण्यात आले होते. काही कक्षांतील खुर्च्या दारावरही भिरकावल्याचे दिसून आले. सायंकाळपर्यंत याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाच्यावतीने तक्रार दाखल झाली नव्हती. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही, असे पोलिस निरीक्षक वंजारी यांनी स्पष्ट केले. रुग्णालयात शिवसेनेसह एआयएमआयएमचे सुमारे शंभर पदाधिकारी जमून त्यांनी घृणास्पद कृत्य करणाऱ्या लॅब कर्मचाऱ्याविरुद्ध घोषणाबाजी केल्याने वातावरण तापले होते. 

काय आहे प्रकरण 
महिला अधिकाऱ्यांसोबत चाचणीसाठी युवती लॅबमध्ये गेली. यावेळी युवतीसह इतराचे स्वॅब घेण्यात आले. त्यानंतर स्वॅब घेणारा लॅब टेक्‍निशियन अलकेश अशोक देशमुख (वय 25, रा. पुसदा) याने संबंधित युवतीस "तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे' असे सांगितले. शिवाय दुसरी युरिनल चाचणी करावी लागेल, असे सांगून तिला थांबवून ठेवले. युवतीला अलकेशच्या वर्तणुकीवर शंका आली. तिने आपल्या भावाला घटनाक्रम सांगितला. युवतीच्या भावाने जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन स्वॅब टेस्ट नंतर कोरोना चाचणीसाठी युवतीला दिलेल्या टेस्टबाबत चौकशी केली असता स्वॅब व्यतिरिक्त दुसरी कोणतीही चाचणी त्यासाठी करावी लागत नाही, असे डॉक्‍टरांनी सांगितले. चाचणी घेणाऱ्या अलकेशने युवतीचा मोबाईल क्रमांक घेतला अन्‌ तिला थोड्या वेळाने "तू खूप सुंदर दिसते, माझ्याशी मैत्री करशील काय?' असा मेसेजही पाठविला. युवतीच्या लॅबटेक्‍निशियनचा उद्देश लक्षात आला. तिने बडनेरा ठाण्यात तक्रार नोंदविली.   (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com